जळगांव(धर्मेश पालवे):-जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच अनोखि रक्षाबंधन साजरी करण्यात आली असल्याचे दिसून आले.रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या सुयुक्त दिनाच्या निमित्ताने शहरातील रणरागिणी ग्रुप तथा इंदूबाई बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका याच्या तर्फे शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा विठ्ठल ससे, कॉ. दिनेशसिंग पाटील,कॉ. प्रशांत देशमुख,कॉ संदीप माने यांना राखी बांधून रणरागिनींच्या सदस्यानि राखी बांधून बंधुप्रेमाच्या भावनेला उजाळा दिला आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी, दारू व्यवयसाय,व चोरट सारख्या गोष्टी वाढत आहेत,आणि यामुळे शहरातील असंख्य महिला व मुलीचे आयुष्य व संसार उघड्यावर पडत आहेत, हे पाहता आपल्या पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आमच्या सारखाय बहिणींचे रक्षण करावे ही भावना व्यक्त केली गेली.
सदर उपक्रमात रणरागिणी च्या सदस्या, महिला, व मुली तसेच जिल्हा महिला आघाडी छावा मराठा युवा महासंघाच्या अध्यक्षा तथा इंदूबाई बहुद्देशीय संस्थापक मंगलाताई सोनवणे, जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे, आणि पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. मा पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनीही रणरागिणी च्या महिला सदस्यांनी पोलीस व नागरिक साहचर्य ठेवून अपेक्षा ठेवली त्यास खरे उतरण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे मत व्यक्त केले .










