Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गालापुर जि.प.शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
गालापुर जि.प.शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

एरंडोल(प्रतीनिधी)- तालुक्यातील गालापुर येथील
आदिवासी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी कवायत घेतली, सर्व पालक सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने बिस्कीट चॉकलेट वाटप करण्यात आले,बालरक्षक व मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी सर्वांना एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शपथ दिली. तसेच तंबाखू मुक्ती ची व मूल्यवर्धनदेखील शपथ उपस्थितांना दिली. राज्य समता विभाग करीत असलेल्या कार्याची व बालरक्षक चळवळ ची संपूर्ण जाणीव करून दिली व स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक निष्ठेने व राष्ट्रभक्तीने निस्वार्थपणे कार्य केल्यास आपला देश जगाच्या पाठीवर लवकरच महासत्ता होईल असे किशोर पाटील कुंझरकर यावेळी बोलताना म्हणाले.कालच सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश शासनाच्या समग्र शिक्षा अभियान शालेय योजनेतून मिळाल्याने त्यांच्या मनाचा आनंद, त्याच जोडीनं टप्प्याटप्प्याने होत असलेल्या शाळा विकास पाहून मन तृप्त झाले. आदिवासी वस्तीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागील तीन वर्षापासून किशोर पाटील कुंझरकर करत असलेली प्रयत्नांची पराकाष्टा तसेच इंग्रजीतून धडे त्याच जोडीने डिजिटल शाळा बाबतीत पुढाकार यामुळे शाळेचा हळू हळू विकास होत आहे. असे गौरवोद्गार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल यांनी काढले. यातच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीने आलेला शुभेच्छा संदेश पालकांना व विद्यार्थ्यांना वाचून दाखवत सर्वांना शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन कुंझरकर यांनी केले. ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आदिवासी वस्तीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छतेसाठी तसेच शैक्षणिक चैतन्य साठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल जिप अध्यक्षा नामदार सौ उज्वला मच्छिंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटभोळे , आदींनी अभिनंदन केले
.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रणरागिणी ग्रुप तर्फे शनीपेठ पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

Next Post

आरक्षण बचाव समितीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next Post
आरक्षण बचाव समितीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

आरक्षण बचाव समितीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo