Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंदराव जाधव यांचा होणार सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/07/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंदराव जाधव यांचा होणार सन्मान

मराठी साहित्य मंडळातर्फे पुरस्कारांची घोषणा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रथितयश वकील मुकुंदराव जाधव यांच्या ” मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाबद्दल मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांना सातारा जिल्ह्यातील कराड येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे निवडक प्रस्तावामधून ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून” या काव्यसंग्रहाची निवड झाली आहे. त्याकरिता त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राजस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबाबतचे पत्र जेष्ठ साहित्यिक डाॅ. जयप्रकाश घुमटकर, जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे, जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी, मराठी साहित्य मंडळाच्या प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी नुकतेच ॲड. मुकुंदराव जाधव यांना दिलेले आहे.

ॲड. मुकुंदराव जाधव हे मुळचे पातोंडा, ता. चाळीसगांव येथिल रहिवासी असून गेल्या २३ वर्षापासून जळगाव येथील जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करीत आहे. “मनाच्या नजरेतून” हा काव्यसंग्रह २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगांव येथे प्रकाशित करण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार ऑक्टोबर महिन्यात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात होणा-या राजस्तरीय काव्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे मराठी साहित्य मंडळाच्या प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर देते अग्नि सुरक्षा प्रात्यक्षिक

Next Post

पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलफरोज शेख यांची बिनविरोध निवड !

Next Post
पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलफरोज शेख यांची बिनविरोध निवड !

पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलफरोज शेख यांची बिनविरोध निवड !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo