Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रायसोनी महाविध्यालयात स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य महारक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

रक्तदान शिबिरात १५० रक्त पिशव्या संकलीत करत गाठला विक्रमी आकडा  

जळगाव : जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट, जिल्हा सामान्य रुग्णालय व एचडीएफसी बँक  यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी रायसोनी इस्टी ट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे, एचडीएफसी बँकेचे प्रवीण जाधव व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे उमेश कोल्हे यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल  यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून रक्तदानाकरीता आवाहन केले व शिबिर कालावधीत रक्तदात्यांची आस्थेने विचारपूस करून मनोबल वाढविले. प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू व डॉ. प्रल्हाद खराटे यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया विभागप्रमुख, प्राध्यापक व विध्यार्थ्यांना समजावून सांगितली. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये एकूण २५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला व एकूण १५०  रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. शिबिराच्या समारोपावेळी एचडीएफसी बँकेचे प्रवीण जाधव व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे उमेश कोळी यांनी महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व गौरव पत्र देवून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच विध्यार्थ्यांचा उत्साह व शिबिराचे सुव्यवस्थित आयोजन याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.

या शिबिराकरिता रायसोनी इस्टीट्यूटचे प्रा. अजय चौधरी, रजिस्टार अरुण पाटील, शीतल जैन, रवी शर्मा, एचडीएफसी बँकेचे चंद्रकांत पाटील, उमेश राणे, हेमंत जोशी, भावेश थोरात, विशाल वाणी, निलेश पाटील व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निलेश पवार, भरत महाले, प्रवीण पाटील, सचिन भाले, मनीष पाटील, प्रभाकर पाटील    यांनी आयोजकाची भूमिका पार पाडली. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायसोनी इस्टीट्यूटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशी निमीत्त सत्संग सभेचे आयोजन

Next Post

निखील ठक्कर यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Next Post

निखील ठक्कर यांना मौलाना आझाद आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo