Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे
प्रतिनिधी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने खिर्डी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्ष वंदनाताई सोनवणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे उपस्थित होते.


जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे हे आपल्या भाषणात म्हणाले की वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये सर्व स्तरातील समाज बांधव प्रवेश करीत असून वंचित बहुजन आघाडी या पक्षाची ताकदवाढत चालली असून, श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शना नुसार खेड्या पाड्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रसार आणि प्रचार जोमाने सुरू असून, लोकांना आता वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की खेड्या पाड्यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावोगावी मीटिंग बैठक घेऊन लोकांना वंचित बहुजन आघाडी ची रूपरेषा व ध्येय धोरण सांगून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा नातवाचा पक्ष असून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून तमाम भारत देशांमधल्या जाती-धर्माच्या लोकांच्या भल्यासाठी दोन वर्ष अकरा महीने 18 दिवस कालावधी लागून हे संविधान लिहिले असून, सर्व धर्माच्या लोकांचे भले या संविधानाच्या माध्यमातून केले असून, भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करून सर्वांना न्याय हक्क दिले. त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर हेसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून या देशांमध्ये वंचित समाजाला न्याय हक्क दिल्याशिवाय राहणार नाही व वंचित समाजाला सत्य मध्ये बसल्याशिवाय शांत बसणार नाही असे ते म्हणाले 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 45 लाख मतदान मिळाले आणि हे पाहून सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणून गेले असे जिल्हाध्यक्ष म्हणाले. अध्यक्षीय भाषणा मध्ये महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे ह्या भाषणा मध्ये म्हणाल्या की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बौद्ध समाजाचा नसून बहुजन समाजाच्या हिताचा पक्ष आहे परंतु इथले जातीवादी पक्ष संघटना यांनी बहुजन समाजाची दिशाभूल केली असून वंचित बहुजन आघाडी बहुजन समाजाचा हिताचा पक्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना अधिकार दिले त्यामुळे आजच्या महिला राज्यकर्त्या झाल्या आणि आज सरपंच पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार राष्ट्रपती असे मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झाल्या हे कोणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यामुळे नाही तर मनुवादी मनुस्मृतीने महिलांना चूल आणि मूल याच्या मध्येच बांधून ठेवले होते. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करून वंचित बहुजन आघाडी पक्ष मजबूत करावे असे अध्यक्षीय भाषणामध्ये त्या म्हणाल्या. या मेळाव्याचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी केले.


या मेळाव्यासाठी वंदनाताई अराक, अलका पारधी, सुलभा मुसळे, आशाताई नेहते,जरीना ताई तडवी, शोभा सोनवणे, संत्रा बाई बारेला, नितीन अवसरमल, गौतम अटकाळे, सलीम शाह, कंदरसिंग बारेला, कालू बारेला, तरुण सवणे, वंचित बहुजन आघाडी मध्ये रामा कोचुरे, यशवंत भंगाळे, जीवन सोनवणे, भावना भंगाळे, रेखा पाटील यांनी प्रवेश केला. तसेच मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन महिला आघाडी तालुकाध्यक्ष गायत्री कोचुरे व आभार कांतीलाल गाढे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पराग घोरपडे यांची महाराष्ट्र राज्य युवा संयोजक पदी निवड

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत ९५० जागांसाठी भरती

Next Post
भारतीय रिझर्व्ह बँकेत ९५० जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत ९५० जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d