Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘वाचणारे गाव’ अशी जळगावची नवी ओळख परिवर्तनमुळे निर्माण होणार- कुलगुरुंसह मान्यवरांचा सूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘वाचणारे गाव’ अशी जळगावची नवी ओळख परिवर्तनमुळे निर्माण होणार- कुलगुरुंसह मान्यवरांचा सूर

जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या सहाव्या पुष्पात आज “अभिवाचन महोत्सव वाचन संस्कृती रुजवण्यास पूरक आहे का?” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सदर चर्चासत्रात चर्चक म्हणून  पी. पी. माहुलीकर कुलगुरू कबचौ उमवि, डॉ. प्रदिप जोशी,  श. दि. वडोदकर, गनी मेमन, जयदीप पाटील व प्रा.निरुपमा वानखेडे लाभले. हा अभिवाचन महोत्सव संजीवनी फौंडेशनच्या अंतर्गत सुरू आहे.रसिकांशी संवाद साधतांना मान्यवरांनी अभिवाचन महोत्सव वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याचे स्पष्ट मत मांडले. अभिवाचनाच्या प्रयोगांमधून पात्रांविषयी रसिकांच्या मनात कुतूहल आस्था निर्माण होत जाते व त्यात वाचनाची उत्सुकता निर्माण होते. घरातील टिव्ही, मोबाईल व इंटरनेट यामुळे छापील पुस्तकांची वाचक संख्या जरी कमी झाली असली तरी ईबुक्सच्या वाचनसंख्या वाढत आहे. परिवर्तनने अभिवाचन महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून अभिवाचनांचा पायंडा शाळांमध्ये देखील सुरू केला आहे. बऱ्याच शाळांनी आता अभिवाचनांच्या स्पर्धा सुरू केल्या हे खरे महोत्सवाचे यश. महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात परिवर्तनने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक पटलावर जळगावची ओळख निर्माण केली आहे. आता ते जळगाव ‘वाचणारे गाव’ म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्राभर अभिवाचनाचे प्रयोग जरी होत असले तरी परिवर्तनने वाचनसंस्कृतीची चळवळ उभी केली आहे. मान्यवरांनी प्रकाशकांना, पालकांना तसेच शाळांच्या मुख्याध्यापकांनादेखील महोत्सवात सहभागाचे आव्हान केले. अभिवाचन महोत्सवाला रोटरी वेस्ट, राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या आवड निर्माण झालेल्या बऱ्याच प्रेक्षकांना जागे अभावी परत जावे लागले. पुढील वेळी कार्यक्रम मोठ्या सभागृहात घेण्याचे आवाहन प्रेक्षकांकडून करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, उद्या मुंबईच्या गिरीष पतके दिग्दर्शित व विजय तेंडुलकर लिखित ‘७४ पावसाळ्याचा जमाखर्च’ या साहित्य कृतीचे अभिवाचन करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्या मंदिर येथे एकदिवसीय भुलाबाई उत्सव साजरा

Next Post

बगोना उलटा और बकरा फरार,बोतल गायब और चखणा पसार-शिवराम पाटील

Next Post

बगोना उलटा और बकरा फरार,बोतल गायब और चखणा पसार-शिवराम पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d