Thursday, October 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2026
in जळगाव, लाइफस्टाइल, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

जळगांव- (प्रतिनिधी )- आरोग्य शिक्षणात विद्यापीठाकडून विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पांना अधिक प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मा. विद्यापीठाच्या मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थ्यांकरीता विद्यापीठातर्फे ‘कुलगुरु संवाद’ कार्यक्रमाचे जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय येथे  आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते सवमेत  कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, श्री. प्रमोद पाटील विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवंेद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. दिपक चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते तसेच परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, श्री. प्रकाश पाटील, श्री. संदीप राठोड दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते.

विद्यापीठाचे मा. कुलगुरु व्यंकट गिते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या अडचणी समजून त्वरीत अंमलबजावणी करणे शक्य होते. आरोग्य संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुलगुरुंशी थेट संवाद साधता येणार आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकरीता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी घ्यावा. सशोधनाकरीता विद्यापीठाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येतो मात्र त्याचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास येते याकरीता विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्पांवर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जागतिक स्तरावर रॅंकिंगमध्ये आरोग्य विद्यापीठ पहिल्या शंभरात येण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षणाची गुणवत्ता आणि स्तर वाढविण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या नियमांचा काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी ई-ऑफिस प्रणाली सक्षमपणे वापरात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्या आदेशानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांनी महिला व बालसंगोपन विषयावर तज्ज्ञांकडून पॉडकास्ट तयार करावेत त्यांचा आरोग्य प्रबोधनाकरीता उपयोग करता येईल. राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आरोग्य संवाद अभियानातंर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नशेचा नकार, मनाशी संवाद, युवाशक्ती जागृत, सुदृढ जीवशैली, राष्टीााव प्रेरणा याबाबत जागृती करण्यात येणार आहे. सर्व विद्याशाखांचा सर्वागिण विकास होणे गरजेचे आहे यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम रावबविण्यात येतात त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करुन घ्यावा.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य संवाद हा विद्यापीठाचा अनोखा उपक्रम असून मा. कुलगु्रु यांच्या समवेत थेट संवाद साधण्यासाठी उपक्रम विद्यापीठाच्या विविध संलग्नित महाविद्यायात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मा. कुलगुरु व कुलसचिव यांना सभागृहातून थेट प्रश्न विचारले. प्रथम वर्षापासून ते पद्व्युत्तरच्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. ग्रेस मार्क रुल्स, विद्यापीठाच्या विविध योजना, विविध केंद्रीय परिषदांचे नियम, परीक्षांच्या निकालाचा कालावधी, संशोधनाचे उपक्रम, आंतरवासियता प्रशिक्षण यासारख्या विविध प्रश्नांची मांडणी सर्वच पॅथीच्या विद्यार्थ्यांकडून मा. कुलगुरुंकडे करण्यात आली. मा. कुलगुरु यांनी व विद्यापीठाच्या अधिकारी यांनी याबाबत विद्यार्थ्यांच्या शंका व समस्यांचे निराकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. देवेंद्र पाटील यांनी मानले.
याप्रसंगी जळगांव जिल्हातील एकवीस आरोग्यशास्त्र महाविद्यालयांतर्फे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.गिरीश ठाकूर, डॉ.संतोश चव्हाण, डॉ. पराग भागवत, डॉ. प्रशांत साळुंखे, डॉ. एस.एस.सिंग, डॉ. माणिक पाटील, डॉ. अशोक कुमार, डॉ. संतोष पाटील, डॉ. अजित विसपुते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरिष ठाकूर, शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे उप-अधिष्ठाता डॉ. महादेव गायकवाड व मा. अधिष्ठाता डॉ. पुष्पेंद्र निकुंभ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष चौहान, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य. विद्यानंद आठवले, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जगदीश वठार यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. रितेश पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यमासाठी श्री. अविनाश सोनवणे, श्री. योगेश आरोटे, श्री. पुष्कर  तÚहाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. विनायक ढोले, श्री. श्री. सोहम वानेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात जळगांव येथील विविध संगग्नित महाविद्यालयातील बाराशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

Next Post

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo