Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार;महिलांनी घरोघरी आरती करुन केले औक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार;महिलांनी घरोघरी आरती करुन केले औक्षण

जळगाव /ग्रामीण – (प्रतिनिधी) – शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार भोकर पंचायत समिती गणातील आमोदा खु, घार्डी, धानोरा खु., करंज, सावखेडा खु., किनोद, भादली खु., भोकर, पळसोद, जामोद, आमोदा बु. या परिसरात संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत अबाल-वृद्ध, महिलांचा उस्फूर्त उत्साहाने सहभाग दिसून आला. मागील कार्यकाळात या भागातील जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून खेडी – भोकर – पुलासाठी 152 कोटींचा निधी मंजूर करून युध्द पातळीवर पुलाचे काम सुरु केले. तसेच जळगाव – खेडी – भोकर – चोपडा रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणासारखी विकासकामे हाती घेतल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी गुलाबराव पाटील याना सांगितले की, तुम्ही वाचनाला खरे उतरलेले नेते असून तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे. “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आहोत” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या सोबत भाजपा, शिवसेना, रॉ.कॉ. व रिपाई महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दणक्यात प्रचार करीत आहे.

महिलांनी केल्या घरोघरी आरत्या

भोकर येथील स्वामी समर्थ स्वाध्याय केंद्राच्या शेकडो महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच परिसरातील गावांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने व ढोल ताशांच्या गजरात खास करून भोकर येथे घरोघरी गुलाबभाऊंचे औक्षण व आरत्या करण्यात आल्या. जणू काही आजच भाऊबीज आहे असे भावनिक वातावरण दिसून आले.

प्रत्येक गावात काढलेल्या भव्य रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, यावेळी रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, रिपाई चे अनिल अडकमोल, पं. स. सभापती जना आप्पा कोळी, राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, शिवाजी पाटील, गजानन सोनवणे, या परिसरातील सरपंच मंगलाबाई सोनवणे, किशोर पाटील, संदीप पवार, समाधान सपकाळे, जितु पाटील, ज्ञानेश्वर सपकाळे, दत्तू सोनवणे, दत्तुभाऊ सोनवणे, बलाशेथ राठी, प्रमोद सोनवणे, राजू लाधी, विजय पाटील, आण्णा सपकाळे, भाजपाचे तालुका प्रमुख हर्शल चौधरी, प्रभाकर पवार (मोठे भाऊ ), शालिक पाटील, लीलाधर पाटील, ज्ञानेश्वर पवार, अरविंद सपकाळे, सेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, मुरलीधर अण्णा, दिलीप जगताप, बळीराम पाटील, गोपाल बडगुजर, सुभाष बडगुजर, भूषण बाविस्कर, सचिन पवार, गोपाल जिभाऊ, पांडुरंग जिभाऊ यांच्यासह व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश;गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात

Next Post

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत

Next Post
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d