Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शेतकरी दिनानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शेतकर्‍यांचा सन्मान

कष्टकरी शेतकर्‍याचा कृतज्ञता म्हणून शेतकरी दिनानिमित्त शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

पाळधी/ जळगांव(प्रतिनीधी)- देश आपला कृषीप्रधान, शेतकरी दिनाच्या निमित्ताने आज आवर्जून करूया बळीराजाचा सन्मान. याच वाक्याला अनुसरण भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस (२३ डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरामध्ये आज शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता करत असलेल्या मेहनतीला कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्म दिवस २३ डिसेंबर हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो, याच अनुषंगाने पाळधी ता. धरणगांव येथे सुर्या फाऊंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे आज रोजी ” गौरव शेतकरी भुमीपुत्रांचा” या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या गौरव सोहळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग राबवून आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे, चांदसर गावाचे सरपंच सचिन पवार, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, राशी सिड्स चे गोपाल पाटील, अखिलेश प्रतापसिंह, शाळेचे आश्रयदाते भगवान सुर्यवंशी, शाळेच्या अध्यक्षा अर्चना सुर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन बैलगाडीचे पुजन करून करण्यात आले. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच ‘शेती’ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. शेतकऱ्याला सन्मानाने ‘बळीराजा’ म्हटले जाते. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांच्या जिवनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उपस्थितांची मने जिंकली.यावेळी परिसरातील शेतकर्‍यांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्या सह गुणवंत पवार, सतिश पाटील, राधिका उपाध्याय, पायल सोमानी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे आयोजन

Next Post

रेड प्लस बैंक च्या वतीने फारूक शेख व डॉ अल्तमश हसन यांचा सत्कार

Next Post
रेड प्लस बैंक च्या वतीने फारूक शेख व डॉ अल्तमश हसन यांचा सत्कार

रेड प्लस बैंक च्या वतीने फारूक शेख व डॉ अल्तमश हसन यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo