Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमती अश्विनी भिडे आणि श्री. संजीव जयस्‍वाल यांनी ‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्‍वीकारला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
श्रीमती अश्विनी भिडे आणि श्री. संजीव जयस्‍वाल यांनी ‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा पदभार स्‍वीकारला

मुंबई – सुशीलकुमार सावळे

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्तपदी श्रीमती अश्विनी भिडे आणि श्री. संजीव जयस्‍वाल यांची राज्‍य शासनाने नियुक्ती केली असून श्रीमती भिडे आणि श्री. जयस्‍वाल यांनी आज (दिनांक ०९ मे, २०२०) पदभार स्वीकारला. यावेळी सह आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने त्‍यांचे स्‍वागत केले.

श्रीमती अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्‍या तुकडीतील अधिकारी असून त्‍यांना सनदी सेवेतील २४ वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांनी आतापर्यंत महाराष्‍ट्रात विविध महत्‍त्‍वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्‍या विभागीय अतिरिक्‍त आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासनामध्‍ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्‍त आयुक्‍तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्‍या सचिव म्‍हणूनही श्रीमती भिडे यांनी काम पाहिले आहे. त्‍याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून त्‍यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्‍याच्‍यादृष्‍टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्‍या निर्मितीत महत्‍त्‍वाचे योगदान दिले आहे. 

श्री. संजीव जयस्‍वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्‍या तुकडीचे अधिकारी असून त्‍यांनीही आतापर्यंत महत्‍त्‍वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने सहाय्यक जिल्‍हाधिकारी म्‍हणून नाशिक व तळोजा (जि.नंदुरबार) येथे काम केले आहे. त्‍यानंतर नाशिक जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, मा. उप मुख्‍यमंत्री यांच्‍या कार्यालयात उप सचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त, औरंगाबादचे विभागीय आयुक्‍त आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त म्‍हणून श्री. जयस्‍वाल यांनी काम पाहिले आहे. त्‍यांनी विविध ठिकाणी केलेल्‍या विशेष कार्यांबद्दल त्‍यांना विविध सन्‍मान आणि पारितोषिके प्राप्‍त झाली आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून शपथ

Next Post
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये ठेवण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून शपथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo