Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जळगाव, दि. 6 (जिमका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रत्येकी १०० क्षमतेची वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत.

या वसतिगृहांच्या कार्यान्वयनासाठी संबंधित तालुक्यांमध्ये सुमारे ९,२०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेली, सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त तसेच शाळा, महाविद्यालये आणि शहराच्या मध्यवर्ती भागाजवळील इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

इमारत भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक असलेल्या मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयात सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

Next Post

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

Next Post
लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo