Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाज निर्मितीसाठी महिला, तरुणींनी प्रशिक्षण घेतलेल्या कौशल्यांचा वापर करावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

आमदार सुरेश भोळे यांचे प्रतिपादन;निमजाई फाऊंडेशनतर्फे पारितोषिक वितरण सोहळा

जळगाव- महिला व तरुणींनी चूल आणि मूल या पलीकडे विचार करण्याची गरज आहे. शासनाच्या कौशल्य विकास योजनेतंर्गत महिला व तरुणींसाठी विविध कौशल्य असलेले अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. योजनेचा महिला तरुणींना लाभ घ्यावा. आपल्यातील कला, कौशल्य समाजासाठी उपयोगी ठरत नसतील, ती कला तसेच कौशल्य व्यर्थ आहे. त्यामुळे कौशल्य विकास योजनेतंर्गत प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या महिला तसेच तरुणींनी इतरांना उभे राहण्याकरीता म्हणजेच समाज निर्मितीसाठी उपयोग करावा. शिक्षणाबरोबरच महिला तरुणींनी संस्कार व आपली संस्कृती टिकवली पाहिजे, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले.

निमजाई फाऊंडेशतर्फे सोमवारी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे बोलत होते. व्यासपीठावर बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या प्रदेश संयोजिका प्रा. डॉ. अस्मिता पाटील, मयुरेश गारमेंट कंपनीच्या संचालिका किर्ती वारके, निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शितल पाटील-बाक्षे, सचिव भूषण बाक्षे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार करुन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शितल पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सुरेखा सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश पाटील, दिपक जावळे, विवेक जावळे, रुपम जावळे, कुणाल कोलते, शिक्षिका रंजना पाटील, हेमलता इंगळे, अर्चना पाटील, रुपाली पाटील, योगीता सपकाळे, भाग्यश्री चौधरी, पूनम चौधरी, नितू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

प्रशिक्षणाव्दारे आत्मनिर्भरतेसाठी मदत

प्रा.डॉ. अस्मिता पाटील यांनी मनोगतात शासनाची कौशल्य विकास योजनेतील अभ्यासक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार्‍या निमजाई फाउंडेशनचे कौतुक केले. विद्यार्थीनींनी प्रशिक्षणाचा उपयोग दुसर्‍या करुन रोजगारक्षम होवून इतरांनाही रोजगारक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. हे प्रशिक्षणाव्दारे मिळालेले कौशल्य तुमची ताकद असून आत्मनिर्भरतेसाठी भविष्यात याची मदत होईल, असे सांगितले. तर किर्ती वारके यांनीही एकीने शिकून दहा जणानी तयार करावे हा विचार करुन स्वतः बिझनेस व्युमन म्हणून समाजासमोर यावे असे आवाहन केले.

या विजेत्यांचा झाला सन्मान

निमजाई फाऊंडेशनतर्फे जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्ताने 15 जुलै रोजी फॅशन शोसह विविध स्पर्धा पार पडल्या होत्या. यातील विजेत्या रुपाली पाटील, अर्चना पाटील,निशा चंदनानी, प्रेरणा चौधरी, मेघा घुसर, आर्शिन शिरपूरकर,  पूजा सैनी, नितू चौधरी, मेघा भालेराव, संजना मेघवानी, रुपाली कापडाने, दीक्षा भोळे, रुपाली कोष्टी, माला सपकाळे, सरिता बारी, किरण काचवानी, सुनंदा कोळी, जया निशा, प्राची तोडकर या विद्यार्थीनींना मान्यवरांचे हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थीनींना शासकीय प्रमाणपत्राचेही मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नवउद्योजकांना बळ मिळण्यासाठी मेळावे गरजेचे- अॅड. उज्ज्वल निकम

Next Post

मानसी बागडे आत्महत्येप्रकरणी कारवाईची अंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post
मानसी बागडे आत्महत्येप्रकरणी कारवाईची अंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मानसी बागडे आत्महत्येप्रकरणी कारवाईची अंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo