Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मानसी बागडे आत्महत्येप्रकरणी कारवाईची अंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मानसी बागडे आत्महत्येप्रकरणी कारवाईची अंनिसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जळगाव :  शहरातील मानसी बागडे या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र अंनिसने समविचारी जिल्हा महिला असोसिएशन यांच्यासह  मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यांनी जात पंचायतीची तक्रार दाखल करून घेण्यास अंनिसच्या कार्यकर्त्याना अनुकुलता दर्शवली आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध मागण्यांद्वारे वस्तुस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे आणि सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांनी जिल्हाधिकार्यांसमोर मांडली. मानसीने जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असे शुक्रवारी २४ रोजी अंनिसने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती दिली. त्यावरून मानसीचे शवविच्छेदन करता आले. मानसीच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिक यांनी आत्महत्या लपविल्याचे त्यावेळी समोर आले.

निवेदनात, मानसीने गळफास घेतल्यावर तिला कोणी मृत घोषित केले ? तिला सरकारी दवाखान्यात का नेण्यात आले नाही ? पोलिसांना का कळविले नाही ? मानसीचा मृत्यू झाल्यावर तिचा अंत्यविधी समाजानुसार व्हावा यासाठी तिच्याकडून दंड का व कोणी वसूल केला ? यात कोण सामील होते ? घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी का तपासले नाही ? संशयित आरोपी दिनकर बागडे हे कोणाला घाबरून मानसीच्या लग्नाला विरोध करीत होते ? असे सवाल करीत अंनिसने या घटनेमागे जातपंचायतच कारणीभूत असावी असा आम्हाला दाट संशय आहे. त्या दिशेने पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी करावी, पुरावे जमा करावे आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये दोषींना अटक करून कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे.

निवेदन देतांना कायदेविषयक व्यवस्थापन विभाग जिल्हा सचिव अॅड. भरत गुजर, अॅड.डी.एस.भालेराव, जितेंद्र धनगर, आर.एस.चौधरी, महिला असोसिएशनचे राजकुमारी बालदी, भारती पाथरेकर, वैशाली पाटील, बिंदिया नांदेडकर, हेमलता रोकडे, मंगला नगरकर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाज निर्मितीसाठी महिला, तरुणींनी प्रशिक्षण घेतलेल्या कौशल्यांचा वापर करावा

Next Post

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

Next Post
भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

भारतीय छात्र संसदेचे पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते घंटानाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo