Wednesday, February 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी ‘या’ तीन जिल्ह्याच होणार भूसंपादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी ‘या’ तीन जिल्ह्याच होणार भूसंपादन

मुंबई(प्रतिनिधी)- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेसही सुरूवात झाली आहे.

सुमारे १९० किलोमीटर लांबीच्या व १२ हजार कोटी रूपये अंदाजित खर्च असलेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी जालना जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी, पूर्णा तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर भूसंपादन होणार आहे. राज्य शासनाच्या आजच्या राजपत्रात याबाबतचा गोषवाराही नमूद करण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग उभारण्याची कल्पना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली होती. या नवीन द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याच्या पूर्वेला असलेल्या परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्याला समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क मिळणार असून, या तीनही जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे व मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाचा शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना मोठा लाभ होईल.

अशोक चव्हाण यांच्या या संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा झाली होती. ७ सप्टेंबर २०२१ रोजी या महामार्गासाठी शासननिर्णय जारी झाला होता व आज राजपत्रही प्रसिद्ध झाले आहे.

अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या प्रकल्पाची कार्यवाही गतीमानतेने सुरू आहे. जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे -राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

Next Post
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d