Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

मेहरुण येथील 'जैन ड्रीम स्पेसेस’ च्या क्रीडांगणावर T 20 चा रंगणार थरार; कान्हदेशातील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/03/2026
in क्रीडा, जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

मेहरुण येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ च्या क्रीडांगणावर T 20 चा रंगणार थरार; कान्हदेशातील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ

जळगाव -(प्रतिनिधी ) – क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केली आहे. यावेळी व्यासपीठावर अड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांची उपस्थिती होती.

Indian Premier League (आयपीएल) च्या धर्तीवरील नियमावलीसह आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
“Own The Game, Lead The League, Build Legacy” अर्थात “खेळावर आपले स्वामित्व मिळवा, लीगचे नेतृत्व करा आणि कायमस्वरूपी वारसा निर्माण करा.” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
या लीगच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विशेष माहिती (Info Box)
स्पर्धा : जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2)
आयोजक : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
स्थळ : जैन ड्रीम स्पेसेस कांताई नगर मेहरुण
स्वरूप : Indian Premier League च्या धर्तीवर T20 क्रिकेट स्पर्धा
विशेषता : पांढरा लेदर बॉल, खेळाडूंचे रंगीत कपडे, दिवस रात्रीचे सामने
क्रिकेट – कान्हदेशातील खेळाडूंना व्यासपीठ

आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!

“नवा जोश, नव्या थरारासह जळगाव क्रिकेट T20लीग तयार! खेळाची ताकद, जळगावची शान म्हणून याकडे बघितलं जाते. जळगाव व कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, या उद्देशाने जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन होईल आणि जळगावचा गौरव वाढेल. व जळगावकरांना मिळणार आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा खेळाडूंसाठी खेळाचा, व्यावसायिकांसाठी व्यवसायाचा मौका… या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन ने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच त्यांनी नोंदणी केल्यानंतर खेळता येईल असेही संघटने तर्फे नमूद करण्यात आले आहे — अतुल जैन, अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

Next Post

“आम्ही आमच्या आरोग्यासाठी” विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

Next Post
“आम्ही आमच्या आरोग्यासाठी” विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

"आम्ही आमच्या आरोग्यासाठी" विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo