Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

१२७ व्या सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 9 : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते.

सन 2022-2023 या वर्षातील, दि. 01 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन या 127 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे राहील.

प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेसाठीचे निकष पुढीलप्रमाणे :-

  1. प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
  2. प्रशिक्षणार्थीचे वय18 ते 35 या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
  3. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
  4. प्रशिक्षणार्थी किमान4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  6. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्ड धारक / आधार कार्ड धारक असावा.
  7. प्रशिक्षणार्थीचा विहीत परिपूर्ण अर्ज असावा त्या अर्जावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  8. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास,अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहीत नमुन्यात अर्ज करावा. आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मंबई-61 येथे दिनांक 21 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन  मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वर्सोवा, मुंबई. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

अमळनेर आगारातील आणखी एक एस.टी. कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल

Next Post

अमळनेर आगारातील आणखी एक एस.टी. कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo