Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून
संरक्षण अधिनियमाचा वर्धापन दिन

जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. असाच सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनेत स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.


कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, मणियार विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजेता सिंग उपस्थित होत्या.


जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, भारतीय घटनेने महिलांना समानतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महिलांना लैंगिक छळापासून मुक्त व सुरक्षित वातावरणाचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने महिलांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. या अधिनियमांतर्गत महिलांची तक्रार असेल, तर त्यांना समितीकडे दाद मागता येईल. या कायद्याच्या पालनाची नियोक्ता आणि आस्थापनांची जबाबदारी आहे.


प्रा. डॉ. सिंग म्हणाल्या, शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी काम करणारी महिला सुरक्षित असावी आणि तिला सन्मान मिळावा यासाठी विभागप्रमुखांनी दक्ष असायला हवे. यावेळी प्रा. डॉ. सिंग यांनी या अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समिती, या समितीचे कार्य, प्राप्त तक्रारींवर करावयाची कार्यपध्दती याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविकात या अधिनियमाची माहिती दिली. सारिका मेतकर यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश

Next Post

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

Next Post
सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo