

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मासवे) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ आणि ९ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
सदर परिषदेचा विषय “सामाजिक कायदे : शाश्वत आणि समावेशी विकास साध्य करण्यात कायद्याची भूमिका” असा आहे.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष दादा चौधरी, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती श्री सुनिल शुक्रे, प्रमुख अतिथी म्हणून मधुकर कुऱ्हाडे ( प्राचार्य,डी टी एस एस कॉलेज ऑफ लॉ, मालाड, मुंबई), महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स चे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष अंबादास मोहिते, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, चेतना महाविद्यालय मुंबई येथील प्राचार्य डॉ. संजय जगताप, के सी ई सोसायटीचे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य युवा कुमार रेड्डी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी मासवे संघटनेची सचिव संजय कुलकर, प्राचार्य डॉक्टर विष्णू गुंजाळ आमच्यावर उपस्थित होते.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी शाश्वत विकासाच्या ध्येयांवर चर्चा करत असताना त्यामध्ये सामाजिक कायद्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत नवप्रगत समाज विकासासाठी काही नवीन सामाजिक कायदे देखील गरजेचे आहेत आणि त्यानुसार त्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होणं हे महत्त्वपूर्ण असल्याने आजच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा विषय आम्ही हा निश्चित केलेला आहे. या विषयाला अनुसरून सबंध भारतातून 81 संशोधकांनी त्यांचा शोधनिबंध सादर केलेला आहे आणि याचे वाचन या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचसोबत या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये श्री मधुकर कुराडे सर आदरणीय न्यायमूर्ती सुनील सुक्रे साहेब आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिरीष दादा मुंबई येथील बालकांचे हक्क अधिकार यावर गेल्या 35 वर्षापासून काम करणारे संतोष शिंदे सामाजिक कार्यकर्ते, प्राचार्य गणेश पवार, मासवे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अंबादासजी मोहिते हे मान्यवर देखील आपल्याला सर्व समावेशक विकास सामाजिक कायदे या विषयावर मार्गदर्शन करतीलच आजच्या या दोन दिवसीय चर्चासत्रात समाज विकासासाठी सामाजिक कायद्यांची महत्त्वपूर्णता योग्यता आणि उपयुक्तता यावर सांगोपांग चर्चा या ठिकाणी घडणार आहे नवनवीन पैलू नवनवीन आयाम या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतील असे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती सुनील जी शुक्रे सरांनी केले. संशोधन शोधनिबंधांचे विमोचन मान्यवरांनी केले.

आज जागतिक महिला दिन या दिनविशेषणाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांचे स्वागत सत्कार झाल्यानंतर मुरलीधर कुराडे यांनी त्यांच्या मनोगतात शाश्वत विकास आणि सामाजिक कायदे या विषयावर राष्ट्रीय स्तरावर ध्येयधोरणे तयार करणे आवश्यक असल्याने आजच्या या दोन दिवसीय कार्यशाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले.

उद्घाटकीय मनोगतात माझी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शाश्वत विकासात कायद्याची भूमिका काय आहे याबाबत सखोल माहिती देत असताना वकिलीचा व्यवसाय तसेच त्यानंतर बारा-पंधरा वर्ष न्यायाधीश म्हणून काम करताना कधीही जातीची ओळख करावीशी वाटली नाही मात्र सध्याच्या कालावधीत जातीचे बंधन पावलोपावली दिसत आहेत आणि सामाजिक कायद्यांची भूमिका समाज विकासात एक आगळे वेगळे प्रारूप निर्माण करणारे आपणास जाणवते सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे. असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री दादा चौधरी यांनी समाजात सामाजिक काम करत असताना कायद्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे परंतु सर्वसाधारण व्यक्ती हा विविध सामाजिक कायद्यान बद्दल आजही साक्षर असला तरी अनभिज्ञ आहे आणि त्यामुळेच कळत नकळत अनेक घटना हाताळताना सर्वसामान्य माणसाची दमछाक होते परंतु महाविद्यालयांमध्ये या विषयासारख्या राष्ट्रीय परिषदा जर सातत्याने होऊ लागल्या तर निश्चितच आजची युवा पिढीचा सामाजिक कायद्यान बद्दलचा अभ्यास हा निश्चितच चांगला होईल आणि शाश्वत व निकोप समाज निर्मितीसाठी अशा कार्यशाळा या उपयुक्त ठरतील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात मला एवढेच आपणास सुचवावेसे वाटते. बीज भाषण मासवे संघटनेचे अध्यक्ष अंबादास मोहिते सरांनी केले.

आभार प्रदर्शन राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश वाणी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कल्पना भारंबे आणि डॉ. नितीन बडगुजर यांनी केले.











