Wednesday, April 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले- विदित गुजराथी;दुहेरी सुवर्णपदक हा दुर्मिळ योग-अभिजीत कुंटे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले- विदित गुजराथी;दुहेरी सुवर्णपदक हा दुर्मिळ योग-अभिजीत कुंटे

पुणे, २८ सप्टेंबर २०२४: – बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत आहे असे ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने येथे सांगितले.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या विदित गुजराथी व महिला संघाचे प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभास महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, मानद सचिव निरंजन गोडबोले, खजिनदार विलास म्हात्रे व उपाध्यक्ष फारुख शेख हे उपस्थित होते.
महिला संघातील सुवर्णपदक विजेती दिव्या देशमुख व सहाय्यक प्रशिक्षक संकल्प गुप्ता हे या समारंभास काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचा ऑनलाईन पद्धतीने गौरव करण्यात आला.‌

बुद्धिबळ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले यावर अजूनही विश्वास बसत नाही मात्र गेली अनेक वर्षांची तपस्या आणि त्याग याचेच हे फलित आहे असे सांगून विदित म्हणाला,” माझ्या या यशामध्ये माझ्या पालकांनी जो त्याग केला आहे त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. लहानपणी नाशिक येथे मी सात आठ वर्षांचा असताना अभिजीत कुंटे याच्याबरोबर डाव खेळण्याची संधी मला मिळाली आणि तेव्हापासूनच आमच्यामध्ये गुरु शिष्यांचे नाते तयार झाले आहे. अभिजीत दादामुळे मी घडलो असे मी अभिमानाने सांगेन.‌ चेस ऑलिंपिक मध्ये आमच्याबरोबरच महिला संघांनी जे काही सोनेरी यश मिळवले ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण दोन फेऱ्यांमधील खराब कामगिरी नंतर त्यांनी जे काही पुनरागमन केले ते खरोखरीच अतुलनीय आहे. ”

बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी जे यश मिळवले त्यामध्ये युवा खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीचा मोठा वाटा आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असे सांगून कुंटे म्हणाले, आणखी दहा-बारा वर्षे तरी भारतीय संघाचे जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात वर्चस्व राहील अशी मला खात्री आहे. महिला संघातील खेळाडू दिव्या देशमुख ही खऱ्या अर्थाने दिव्यत्व लाभलेली खेळाडू आहे. मी तिला अकरा फेऱ्यांमध्ये तुला खेळायचेच आहे असे सांगितले होते आणि तिने हा विश्वास सार्थ ठरवीत संघास सुवर्णपदक जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेच्या वेळी डी. गुकेश, विदित व दिव्या यांच्या सह्या आणि छायाचित्रे घेण्यासाठी अनेकजण गर्दी करीत होते यावरूनच या खेळाडूंनी लोकप्रियता मिळवली होती आहे याचा प्रत्यय येतो.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे विदित गुजराती व दिव्या देशमुख यांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर ग्रॅण्ड मास्टर अभिजीत कुंटे व सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅण्ड मास्टर संकल्प गुप्ता यांना दीड लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. दोघांचाही पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल तसेच पीवायसी जिमखानाचे सह सचिव सारंग लागु, आमोद प्रधान यांच्यातर्फे देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी निरंजन गोडबोले यांनी तर आभार उपाध्यक्ष फारुक शेख यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक रेबीज दिन साजरा;चावा घेतल्यानंतर २४ तासात अँटी रेबीज लस घ्यावी-डॉ.राजेश सोनवणे

Next Post

‘अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या, मानधन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये केले’; उदगीरमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Next Post
‘अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या, मानधन १० हजार  रुपयांवरून १५ हजार रुपये केले’; उदगीरमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

'अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या, मानधन १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये केले'; उदगीरमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच;जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d