Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ भडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ भडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

दिनांक 24 डिसेंबर 2020 गुरुवार रोजी स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेमार्फत भव्य रक्तदान शिबिर भडगाव येथे संपन्न करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्रालयाचे अव्वर सचिव प्रशांत दादा पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील डॉ.पूनम ताई प्रशांतराव पाटील कोकिळाताई पाटील भडगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका योजनाताई पाटील देविदास तात्या पाटील ग.स.बँकेचे माजी अध्यक्ष विलास नेरकर समर्पण हॉस्पिटल चे डॉ. निलेश पाटील पिंपरखेड आरोग्य केंद्राचे डॉ. प्रतिक भोसले डॉ. सोनवणे जनसेवा ब्लड बँकेचे डॉ. मनोज माळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र पाटील देवराम सदा पाटील पत्रकार सुधाकर पाटील लीलाधर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाहण्यात आले यानंतर स्वर्गीय साधनाताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच कर्मवीर तात्याबाबा, कै.ताई आजी, कै.युवराज दादा पाटील, कै.अशोक अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वडजी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी पाटील सर यांनी केले.


तसेच याप्रसंगी साधनाई फाउंडेशन आमडदे यांच्यातर्फे साधनाई दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करून ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉक्टर पुनम ताई पाटील यांनी सर्व रक्तदात्यांना रक्तदान हेच जीवनदान आहे असे महत्व पटवून दिले व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे आवाहन केले समर्पण हॉस्पिटल चे डॉ. निलेश पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्वात भव्य रक्तदान शिबिर असल्याचे यावेळी जाहीर केले त्यानंतर मान्यवरांच्या समक्ष किसान परिवारातील व आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 300 रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी संस्थेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले सर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण किसान परिवारातील सदस्य यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भगीरथ शाळेत साने गुरुजी जयंती निमित्त ऑनलाइन कथाकथन

Next Post

ऍड.बबन बाहेती क्रिकेट स्मृती चषक स्पर्धा ३० पासून

Next Post

ऍड.बबन बाहेती क्रिकेट स्मृती चषक स्पर्धा ३० पासून

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo