Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा’ उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा’ उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर झंडा’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला कृति आराखडा तयार करुन जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत हर घर झंडा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधिक्षक ग्रामीण प्रवीण मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून या गौरवाशाली पर्वानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. जनतेच्या मानात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशभरात 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात हर घर झंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, याकरीता जिल्हा परिषदर, महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरीकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी करावी. हा उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होईल याकडेही लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात ‘हर घर झंडा’ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांनी राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के सी ई चे आय एम आर ला नॅक A प्रमाणपत्र प्राप्त

Next Post

यावल वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करुन वन महोत्सव सप्ताह साजरा

Next Post
यावल वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करुन वन महोत्सव सप्ताह साजरा

यावल वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करुन वन महोत्सव सप्ताह साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo