Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

Desk Team by Desk Team
18/08/2026
in विशेष
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

३०० रोपांची लागवडीसह ४ हजार सीड बॉलची पेरणी

जळगाव, दि. 16 प्रतिनिधी : हरित महाराोष्ट्र अभियानांतर्गत अनुभूती निवासी स्कूल, जळगाव वनविभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व सीड्स बॉल पेरणी उपक्रम उत्साहात पार पडला. अनुभूती निवासी स्कूलच्या पाठीमागील राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०७ येथे झालेल्या या उपक्रमात शाळेतील १८७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्थानिक वृक्षप्रजातींच्या ३०० रोपांची लागवड केली. तसेच करंज, कांचन, बूच, बांबू, रिठा आदी वृक्षप्रजातींच्या ४ हजार सीड्स बॉलची पेरणी ही केली. राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हा उपक्रम जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. वृक्षारोपणावेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, विक्रांत जाधव, वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील गोसावी, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सुरक्षा अधिकारी एस. एस. भुसांडे, डॉ. समीर पवार, गार्डन विभागाचे संदीप पाटील, गिरीश जगताप, विठ्ठल बारी, शुभम काळे, अजय जाधव, आकाश कोळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील हरित आच्छादन वाढण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

Desk Team

Previous Post

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo