Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

Desk Team by Desk Team
18/08/2026
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव दि. १७ प्रतिनिधी : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लूने जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ग्रीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जैन स्पोर्टस अकॅडमीच्या ब्लू संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १७१ धावा केल्या. संघाकडून क्रिषी नथानीने २१ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ४ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. लोकेश पाटीलनेही ४५ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जैन स्पोर्टस अकॅडमीचा ग्रीन संघ २० षटकांत ८ गडी गमावून १०७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ग्रीन संघाकडून जितेंद्र नाईकने ३२ चेंडूत ३९, तर पुर्वेश चौधरीने २२ चेंडूत ३१ धावा केल्या. जैन स्पोर्टस अकॅडमी ब्लू संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजय मिळवून दिला. अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार क्रिषी नथानी याला देण्यात आला.
दि. १३ जुलै पासून आजपर्यंत चालेल्या या स्पर्धेत एकूण २९ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान २८ सामने खेळविण्यात आले. या सामन्यांमध्ये १७३ षटकार, ६२४ चौकार लगावत ६९०० धावांची आतषबाजी पाहायला मिळाली. सोबतच ४०५ विकेट सुद्धा गोलंदाजांनी काढल्यात. अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट युसूफ मकरा, खजिनादार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जैन स्पोर्टस अकॅडमचे मुख्य कोच सुयस बुरकूल उपस्थीत होते. मोहम्मद फजल यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेतील उपविजेता ग्रीन, तर विजेता ब्लू संघासह स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी गौरव करण्यात आला. ५ मॅचमध्ये १९० धावा केल्याने अक्षय मेघानी बेस्ट बॅटमॅन म्हणून गौरवले. ५ मॅचमध्ये ९ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सैफ याला बेस्ट गोलदांज, तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मोहम्मद नोमान याला सन्मानित करण्यात आले त्याने १४८ धावांसह हॅट्रिक घेत ७ विकेट घेतल्यात. चषकासह कॅश पारितोषीकाने सर्वांना सन्मानित करण्यात आले.

पुर्वेश चौधरी या खेळाडूंने जेसीएल टी-२० सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती त्याला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी बॅट व क्रिकेट किट पुर्ण साहित्य देण्याचे जाहिर केले होते. ते साहित्य मान्यवरांच्या उपस्थित देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

संपूर्ण स्पर्धेत संदीप जरे, प्रविण इंगोले, संतोष बडगुजर, मुश्ताक अली, पंकज पुरोहीत, मोहम्मद साद, मोहम्मद फजल यांनी पंच आणि गुणलेखक म्हणून काम पाहिले.

Desk Team

Previous Post

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo