Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मध्यरात्री २.३० वा. वैद्यकीय तज्ञांनी दिली ‘ट्रिटमेंट फर्स्ट’ची अनुभूती
जळगाव - शेतीकाम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍या सोयगावच्या रूग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. रविवारी दि. २७ रोजी रात्री ११ वा. अत्यवस्थ परिस्थीतीत रूग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयाशी संबंधित तपासण्या झाल्यानंतर अत्यंत आव्हानात्मक परिस्थीतीत मध्यरात्री २.३० वा. हृदयरोग तज्ञ आणि त्यांच्या टीमने या रूग्णाची प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी यशस्वीरित्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनेशसिंग हजारी (वय ४९) हे औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील रहिवासी आहेत. मूळात शेती करणारे दिनेशसिंग हजारी यांना अंगमेहनतीमुळे कधीही कुठलाही त्रास झाला नव्हता. मात्र रविवारी दि. २७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर दिनेशसिंग हजारी यांना छातीत दुखू लागले. थोडे अस्वस्थ वाटल्यानंतर त्यांनी स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार केला. मात्र तरी देखील जीव कासावीस होत असल्याने त्यांनी पुन्हा स्थानिक डॉक्टरांना तपासणीसाठी घरी बोलावुन घेतले. डॉक्टरांनी इसीजी आणि रक्तदाब तपासणी केली असता त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. हजारी यांच्या कुटूंबियांनी त्यांना तात्काळ त्याच दिवशी रात्री ११ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
एन्जीओग्राफीत आढळुन आले हृदयातील ब्लॉकेज 
दिनेशसिंग पाटील यांना जेव्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा अत्यंत अत्यवस्थ परिस्थीती होती. हृदयालयातील हृदयरोग तज्ञ डॉ. प्रदीप देवकाते यांनी रूग्णाची गंभीर परिस्थीती लक्षात घेता एन्जीओग्राफीची तपासणी केली. या तपासणीत दिनेशसिंग यांची एक व्हेसल १०० टक्के तर दुसरी ९० टक्के ब्लॉक असल्याचे निदान करण्यात आले. निदानानंतर हृदयरोग तज्ञ डॉ. देवकाते यांनी हजारी कुटूंबियांना माहिती देत एन्जीओप्लास्टी तातडीने करण्याचा सल्ला दिला. हजारी कुटूंबातील सदस्यांनीही तात्काळ त्यास अनुमती दिली. त्यानंतर डॉ. देवकाते यांनी अत्यंत जोखमीची आणि आव्हानात्मक असलेली एन्जीओप्लास्टी दोन स्टेंट टाकून यशस्वी केली. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील हे देखील शस्त्रक्रियेसाठी उपस्थित होते. शस्त्रक्रियेसाठी  निवासी डॉ. सुशांत वागज, जैस जोश यांच्यासह हृदयालयाच्या टिमने सहकार्य केले. 
‘ट्रिटमेंट फर्स्टची अनुभूती’
सोयगावचे दिनेशसिंग हजारी यांना रात्री ११ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्रीच्या परिस्थीतीतही रूग्णसेवेला प्राधान्य देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉ. प्रदीप देवकाते, डॉ. वैभव पाटील आणि हृदयालयाच्या टिमने कुठल्याही पैशांची किंवा योजनेची वाट न बघता उपचाराला सुरूवात केली. त्यामुळे ‘ट्रिटमेंट फर्स्ट’ ची अनुभूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आली. 
आव्हानात्मक  पण टिमवर्कमुळे यश
रात्रीबेरात्री एखाद्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यानंतर रुग्णाला काहि वेळातच जर रुग्णालयात दाखल केले तर त्यावर उपचार करणे शक्य होते. सोयगाव येथील दिनेशसिंग ह्या रुग्णाला अशाच स्वरुपाचा हृदयविकाराचा झटका आला होता. दोन व्हेसल्स ब्लॉक असल्याने एंजिओप्लास्टी आव्हानात्मक होती पण टिमवर्क आणि रुग्णाची इछाशक्ती ह्यामुळे हि शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. 
- डॉ प्रदिप देवकाते
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची(रिझोल्युशन प्लॅनची) यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

Next Post

उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत

Next Post

उन्हाळी हंगामातील पिकांसाठी 15 एप्रिलपर्यंत पाणी अर्ज करावेत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo