Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या कर्ज निराकरण योजनेची(रिझोल्युशन प्लॅनची) यशस्वी अंमलबजावणी पूर्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 30 (प्रतिनिधी) -भारतातील प्रथम क्रमांकाच्या आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सूक्ष्मसिंचन प्रणाली उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने 29 मार्च 2022 ला झालेल्या सर्व कर्जदारांच्या संयुक्त सभेत ‘कर्ज निराकरण योजना’, 10 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मास्टर रिस्ट्रक्चरींग अॅग्रीमेंटनुसार काही अटींची पूर्तता केल्यावर मंजूर व जाहीर करण्यात आली. ही कर्ज पुनर्रचना पूर्ण झाल्यावर कंपनीच्या सर्व कर्जदारांनी कंपनीच्या कर्ज सुविधा सामान्य केल्या असून मागील काळातील सर्व अनियमितता, निष्क्रियता दूर केल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने 7 जून 2019 ला विशिष्ट धोरण असलेल्या (संपत्तीच्या) कर्ज निराकरणासाठी धोरणपूर्वक मांडणी जाहीर केल्यानंतर या कर्ज निराकरण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेला आयसीआरए आणि क्रिसिल या संस्थांनी RP-4 रेटींग दिले आहे. कंपनीच्या सगळया सुरक्षित कर्जदारांनी या योजनेस संमती दिल्यामुळे ही कर्ज निराकरण योजना आकारात आली आहे.
विविध राज्य सरकारांकडील कंपनीस येणारी येणी मिळण्यास उशीर झाल्याने खेळत्या भांडवलास अडचण येत होती आणि यामुळेही या कर्ज फेडीला उशीर ही होत होता. कंपनीच्या कर्जनिराकारण योजनेची पूर्तता झाल्याने या सर्व अडचणींचे निराकरण होणार आहे.
एकत्रित निराकरण झालेल्या कर्जाची रक्कम अंदाजे 3878 कोटी रूपये झाली आहे.


संपूर्ण कर्जाच्या 40 टक्के कर्ज अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये 0.01 टक्के व्याजावर परिवर्तीत करण्यात आले आहे.
प्रवर्तकांनी कंपनीत काही रक्कम आणणे मान्य केले होते. त्यानुसार त्यातील 267 कोटी रूपयांपैकी  40 टक्के रक्कम आधीच आणलेली आहे. प्रवर्तक उरलेली रक्कम येत्या काही महिन्यांत कंपनीत भरतील.
कर्जदारांना 7.89 कोटी रूपयांचे साधारण समभाग यामध्ये दिलेले आहेत.
या काळात कंपनीने विदेशातील 200 दशलक्ष डॉलर्स रकमेच्या कर्जरोख्यांची पुनर्रचना  केली आहे.
या कर्ज निराकरण योजने संदर्भात कंपनी सविस्तर माहिती या आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेबतपासणी व लेखा परीक्षण झाल्यानंतर जाहीर करणार आहे.


कर्ज निराकरण योजनेमुळे कंपनीवर होणारा सकारात्मक परिणाम व कामगिरी
या योजनेमुळे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला रू. 300 कोटींची अतिरिक्त खेळत्या भांडवलासाठीची सुविधा उपलब्ध होणार आहे, यासह कंपनीच्या कर्जावरील व्याजात मोठी घट होणार आहे. तसेच कर्जदारांना अधिक कालावधीत द्यायची रक्कम आणि कंपनीचा निधी प्रवाह (फंड फ्लो) सुरळीत होऊन कंपनीच्या कामकाजात आणि कामगिरीत संपूर्ण सुधारणा होईल.


“स्टेट बँक ऑफ इंडिया हया कर्जदारांच्या समूहातील अग्रगण्य बँक आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे कंपनीच्या सगळया भागधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी एकत्रीत काम करत आहेत. या कर्जनिराकरण योजनेच्या सुरूवातीपासून ते अंमलबजावणीपर्यंतचा कालावधी फार कठिण होता. तथापि सगळया भागधारकांची श्रद्धा, आणि कर्जदारांचा व्यवस्थापनावर असलेला विश्वास यामुळे प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांने कंपनीला व व्यवस्थापनाला ही कर्ज निराकरण योजना  (रिझोल्युशन प्लॅन – आरपी) यशस्वीपणे अमलात आणता आली.”

अनिल जैन,
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
जळगाव

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांनी घेतले व्यक्तिमत्व विकासाचे धडे

Next Post

हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी

Next Post
हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी

हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या सोयगावच्या रूग्णावर आव्हानात्मक प्रायमरी लाईफ सेव्हींग एन्जीओप्लास्टी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo