Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

४०व्या वर्षी ४० किलोमीटर स्केटिंग करून विक्रम करणारे पोलीस विनोद अहिरे यांचा बहुजन रयत परिषदेकडून एकवीस हजार रुपयाचे बक्षीस देऊन सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
४०व्या वर्षी ४० किलोमीटर स्केटिंग करून विक्रम करणारे पोलीस विनोद अहिरे यांचा बहुजन रयत परिषदेकडून एकवीस हजार रुपयाचे बक्षीस देऊन सत्कार

जळगाव(प्रतिनीधी)- येथील जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी आपल्या ४०व्या वाढदिवशी ४० किलोमीटर स्केटिंग करून विक्रम केलेला आहे. आणि असा विक्रम करणारे ते देशातील पहिले पोलीस ठरलेले आहेत. नियमित व्यायाम आणि सराव केल्यास पोलीस हा चाळीसाव्या वर्षीदेखील फिट राहू शकतो. ही प्रेरणा देशातील सर्व पोलिसांना विनोद अहिरे यांनी दिलेली आहे. म्हणून त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन अमळनेर येथील बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश बोरसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विनोद अहिरे यांचा शाल श्रीफळ व२१ हजार रुपये रोख देऊन त्यांचा सत्कार केला. सत्कार प्रसंगी श्री बोरसे म्हणाले की सहसा समाजामध्ये असा समज आहे की पोलीस खात्यात भरती झाल्यावर पोलीस स्थूल होऊन जातात त्यांचे पोट सुटून जाते ते काही अंतर देखील राहू शकत नाही, असा समज समाजामध्ये बहुतांशी पोलिसांच्या बाबतीत असतो परंतु पोलीस विनोद अहिरे यांनी आपल्या विक्रमा द्वारे दाखवून दिले आहेत की, पोलीस हा ४०व्या वर्षी देखील फिट राहू शकतो. आणि चाळीस किलो मीटर स्केटिंग देखील करू शकतो, सत्काराला उत्तर देताना विनोद अहिरे म्हणाले की, संकटांमुळे कोणी संपत नाही तर त्यातून एका जिद्दीचा जन्म होत असतो. जीवनातील प्रत्येक वादळ आपल्याला संपवण्यासाठी येते असं नाही तर ते आपल्या क्षमतांची परीक्षा घेण्यासाठी येत असते. म्हणून संकटांवर असं काही तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे, आणि हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे. आणि सत्य हे जास्त दिवस लपून राहत नाही ते एक दिवस समोर येतेच, माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या प्रेरणेने मी आज हा विक्रम करू शकलो. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हाध्यक्ष  प्रकाश बोरसे यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून अहिरे यांचे कामगिरीबद्दल अभिनंदन केले. सदर प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकारी पत्रकार संजय मरसाळे, पत्रकार सुरेश कांबळे, डी बी खरात, मुख्याध्यापक कधरे सर, अनिल मरसाळे, मनोज बोरसे, सागर अंभोरे, समाधान शिंदे, गुलाब बोरसे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण सपकाळे, नरेश बागडे, मुकुंद सपकाळे विनोद देशमुख प्रवीण पाटील, फारुक शेख, दिलीप सपकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम हा पॅंथर स्पोर्ट्स क्लब जळगाव च्या वतीने स्केटिंग खेळाडू व त्यांचे पालक यांनी जळगाव येथील बहिणाबाई गार्डन येथे दिनांक ०१/१२/१९ रोजी आयोजित केला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात एड्स विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न

Next Post

सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

Next Post
सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

सरस्वती विद्या मंदिरात तिन दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo