Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि. 18 प्रतिनिधी – दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांची महासंघाच्या सल्लागार समिती मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बुद्धिबळाच्या विकासासाठी खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणे, योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन तसेच बुद्धिबळ खेळातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ करत असते.

क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या अशोकभाऊ जैन यांच्या कार्याची दखल घेत बुद्धिबळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या अशा महासंघाच्या सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीयस्तरावरील अशोक जैन यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे. या सभेस अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, सचिव भरतसिंग चौहान, महासंघाचे मुख्य प्रशिक्षक व चेअरमन अभिजीत कुंटे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मयुर. सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक

Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo