Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

महापौरांकडून कामाची पाहणी : नगरसेवक बंटी जोशी यांचा पाठपुरावा

जळगाव, दि.१४ – शहरातील रामदास पार्कवरील प्रशस्त उद्यानाच्या साकारण्यास आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. स्थानिक नगरसेवक अनंत जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर काम सुरु झाले असून मकरसंक्रांतीच्या मंगल पर्वावर महापौर व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी पाहणी केली आली. या कामामुळे शहरातील नागरिकांना दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले गेले आहे.

शहराच्या मुख्य परिसरात असलेल्या रामदास कॉलनीतील रामदास पार्क मैदानावर उद्यान विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी ठराविक नागरिकांच्या विरोधामुळे तो प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, प्रभाग क्र.12 चे नगरसेवक नितीन बरडे, अनंत ऊर्फ बंटी जोशी, शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत सुरळकर याप्रसंगी उपस्थित होते.

रामदास पार्कवरील उद्यानाच्या कामासाठी 83 लाख रुपये निधी महापालिकेतर्फे मंजूर करण्यात आलेला असून, हा निधी खर्च करण्याची मुदत दोन महिने असल्याने हे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून संबंधित ठेकेदाराकडून विस्तृत माहिती घेऊन त्यांना सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासह गुणवत्तेचा दर्जा राखण्यासंदर्भात काही मौलिक सूचनाही केल्या. या उद्यानाच्या कामासंदर्भात प्रभाग क्र. 12 चे नगरसेवक नितीन बरडे व अनंत ऊर्फ बंटी जोशी यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू ठेवलेला होता. त्यामुळे आता लवकरात लवकर एक सुंदर भव्य उद्यान नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळणार आहे.

उद्यान उभारणीचे आणि विकसित करण्याचे उर्वरित काम सीएसआर फंडच्या माध्यमातून केले जाणार आहे. जळगावकरांना आणखी एक सुसज्ज उद्यान मिळणार आहे. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक आणि महापौरांचे आभार मानले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी – बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये

Next Post

RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

Next Post
RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

RTE प्रवेश घेताय...मग हे नक्की वाचा...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo