Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि.९ : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांचा आढावा आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबरच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले,राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज रोजी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसानीचे आकडे वाढत आहेत. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी काही प्रातिनिधीक ठिकाणी जाऊन पंचनामे केले जात आहेत अशा ठिकाणांची पाहणी करावी. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये ही खबरदारी घ्यावी.तसेच केलेल्या पंचनाम्यांची शहनिशा करण्यात यावी. शेती, घरे, पशुधन, फळबागा, शेत जमीन खचलेली क्षेत्र, दरडी कोसळलेल्या शेत जमिनी, ग्रामीण रस्ते, शाळा, शासकीय इमारती, पुल, कॅनाल, फुटलेले तलाव याबाबत तसेच इतर बाबींची नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्या ठिकाणी तातडीने मदत आवश्यक आहे अशा वेळी राष्ट्रीय व  राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत तातडीने घेण्यात यावी. आपत्तीमध्ये मृत व्यक्तींच्या वारसदारांना तातडीची मदतीचे वितरणही तात्काळ करण्यात यावे.दरड कोसळण्याची अथवा अशी ठिकाणे असतील अशा परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.कोरोना परिस्थीतीत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन या नुकसानीच्या पंचनामे करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्याबाबत राज्य शासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.शासनाकडून  जुलै महिन्यात जाहिर केलेल्या मदतीचे वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे  असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती या बैठकीत दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनपा समूह साधन केंद्र क्रमांक 9 तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव मार्फत शिक्षक गौरव सोहळा संपन्न

Next Post

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी डॉ. महेश चौधरी

Next Post
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी डॉ. महेश चौधरी

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी डॉ. महेश चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo