Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल, मुलींचे नेत्रदीपक यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल, मुलींचे नेत्रदीपक यश

अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी.

कु. पुर्वा राजपूत शाळेत प्रथम

जळगाव, दि. १७ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वी चा
सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे .
अनुभूती शाळेत यंदा 10 वी साठी एकूण 51 विद्यार्थी होते, त्यातील 50 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे, या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 15, 81 ते 90 टक्के गुण मिळविणारे 34, 74 ते 80 टक्के गुण मिळविणारे 2 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.


पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (95.60 %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (94.00 %), दिव्या विलास बारी- तृतीय (93.20 %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (92.60), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (92.20) ठरली.
गुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.


इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 95 च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत 98 गुण, गणित विषयात वैष्णवी पवार 95 गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे 94 गुण, हिंदीमध्ये पुर्वा 93 गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण 93 गुण मिळविले आहेत.

कोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मकस्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.


शाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात. तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.


समाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत अनुदान प्राप्तीसाठी  दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

Next Post
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d