Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘आत्रंप्रिनर’कार्यक्रमाचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘आत्रंप्रिनर’कार्यक्रमाचा शुभारंभ

आंत्रप्रिनर प्रोग्रामच्या शुभारंभाप्रसंगी दीपप्रज्वलन करताना अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव, मनोज परमार, निलम समदानी आदी.

डॉ. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेवर आधारित ‘एनलाइटनंट आत्रंप्रिनर’

जळगाव प्रतिनिधी (दि.13)- अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कूल नेहमीच परिवर्तनात्मक आणि प्रयोगशील शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रगण्य असून सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवित असते. आज इयत्ता ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय उद्योजकता कार्यक्रम सुरू केला, ज्यात या विद्यार्थ्यांना प्रथम अनुभव,व्यवसायाच्या रूढी, उद्योजक विचार आणि दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि दीर्घकालीन दृष्टीकोन विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

अतिशय वेगळा व परिणामकारक असा हा उपक्रम असून याचा शुभारंभ अनुभूती शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य जे.पी.राव, मनोज परमार,निलम समदानी व शिक्षकवृंद उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठीचे शिक्षण घेऊ नये, तर नोकरी देणाऱ्याचा विचार घेऊन आपला मार्ग निर्माण करावे असे प्रोत्साहित करणारे विचार सौ. निशा जैन यांनी मांडले.

डॉ. भवरलाल जैन यांच्या “स्टेटमेंट ऑफ पर्पज” या पुस्तकावर आधारित हा “आंत्रप्रिनर प्रोग्राम” असून विद्यार्थ्यांच्या मनात उद्योजक बनण्याचे बिजारोपन व्हावे, त्यांनी स्वतंत्र विचार करून देश घडवावा यासाठी हा कार्यक्रम आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना खऱ्या उद्योजकांच्या गुणधर्मांबद्दल समजावून सांगणे. भविष्यात शाळेचे उद्दिष्ट-विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी प्रदान करणे आणि उद्योग व वाणिज्य या विषयावर विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण प्रदान करणे असा हा कार्यक्रम आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईव्हीएम विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीची उद्या बैठक

Next Post

भारतीय विद्यार्थी सेनेची आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

Next Post
भारतीय विद्यार्थी सेनेची आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

भारतीय विद्यार्थी सेनेची आढावा बैठक आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo