Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत करता येणार  अर्ज

जळगाव – (जिमाका)- राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी १४ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्चत कृषि योजनेंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतक-यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी अर्ज नोंदणी बाबत कार्यालय स्तरावरुन मोहिम राबविण्यात येत आहे.

३० नोव्हेंबर ते दि.१४ डिसेंबर या कालावधीत कार्यालय स्तरावरुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरुन अर्ज रद्द होणार नाही. तरी जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कुरबान तडवी यांनी केलेले आहे.
अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक आहे. यासोबतच आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद ७/१२ उता-यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ. बाबत स्वयंघोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ ५ हेक्टर पर्यंत देण्यात येईल. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतक-यांना लघु संदेशाव्दारे कळविण्यात येणार आहे. पूवसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल, संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकांमार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

Next Post

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Next Post
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo