Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनेकांनी नाकारले-मात्र गोदावरीने तारले;तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर हृदयालयात जोखमीची एन्जीओप्लास्टी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अनेकांनी नाकारले-मात्र गोदावरीने तारले;तीव्र हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर हृदयालयात जोखमीची एन्जीओप्लास्टी

जळगाव – छातीतील तीव्र वेदनेने विव्हळत असलेल्या रुग्णाने अनेक रुग्णालयाचे दार ठोठावले. मात्र रुग्णाची प्रकृती पाहत अनेकांनी त्यास नाकारले. अशा अवस्थेत हृदयालयात आलेल्या ५१ वर्षीय रुग्णाला गोदावरीने तारल्याचीच प्रचिती रुग्णाच्या कुटूंबियांना दिसून आली. सुट्टीच्यादिवशी सुद्धा रुग्णाला इमरजन्सी सेवा देत डीएम कार्डियोलॉजिस्ट यांनी तात्काळ एन्जीओप्लास्टी करत बंद असलेली रक्‍तवाहिनी मोकळी केल्याने रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

एका ५१ वर्षीय रुग्णाला छातीत वेदना झाल्या आणि त्यांना अस्वस्थता जाणवली, त्यात हृदयाची गती मंदावल्याने श्वासोच्छवासासही अडचण निर्माण झाली. अशा अवस्थेत नातेवाईकांनी रुग्णाला अनेक रुग्णालयात नेले मात्र प्रकृती फारच खालावल्याने रिस्क जास्त होती, त्यामुळे रुग्णालयांनी नाकारले मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने तात्काळ रुग्णाला दाखल करुन घेतले. डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी तात्काळ ईसीजी, टू डी इको काढून घेण्यास सांगितले असता त्यात रुग्णाला तीव्र हृदयाचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थीतीची माहिती देवून समुपदेशन करण्यात आले, त्यानंतर लगेचच एन्जीओग्राफी केली असता मुख्य रक्‍तवाहिन्याच्या मुखाशी एक १०० टक्के ब्लॉक होता, त्यामुळे लगेचच एन्जोप्लास्टी करण्यात येवून स्टेन्टद्वारे तो ब्लॉक मोकळा करुन रक्‍तप्रवाहास मार्ग मोकळा करुन देण्यात आला. काही वेळ मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात रुग्णाला ठेवण्यात आले. आता रुग्णाच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.प्रदिप देवकाते यांनी रुग्णाची एन्जीओप्लास्टी केली. त्यांना तंत्रज्ञ वैभव वाणी, जयेश जोश, गोल्डी सावले, अमोल पाटील, दिपाली भामरे, कुंदन भंगाळे, ललिता भिरुड, डिंपल पाटील, राहुल नेहते, प्रांजली घोटांगले, सुरज नारखेडे आदिंचे सहकार्य लाभले.

हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स महत्वाचे
छातीत कळा किंवा तीव्र वेदना जाणवल्यास हे हृदयविकाराचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. अशा परिस्थीतीतील हृदय रुग्णांसाठी गोल्डन अवर्स खुप महत्वाचे असतात. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी सुरवातीचे दोन तास आणि त्यानंतच्या १२ तासात एन्जीओग्राफी, एन्जीओप्लास्टी झाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत होते.

  • डॉ.वैभव पाटील,
    डीएम कार्डियोलॉजिस्ट
    डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड

Next Post

दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

Next Post
दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo