Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासनातर्फे 2500 किलोग्रॅम खाद्यतेलाचा साठा जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासनातर्फे 2500 किलोग्रॅम खाद्यतेलाचा साठा जप्त

जळगाव, दिनांक 18 – अन्न व औषध प्रशासन, जळगांव कार्यालयामार्फत दिवाळी सणानिमित्त जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने खाद्यतेलाबाबत प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. खाद्यतेल, रिपॅकर, घाऊक विक्रेते यांचेकडुन शहरात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी 13 नमुने घेतले आहे. तसेच 3 खाद्य तेल आस्थपनांकडील सुमारे 2500 किलोग्रॅम इतका शेंगदाणा तेल, आर. बी. डी पामोलीन तेलाचा साठा भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी घेण्यात आलेले नमुने अन्न विश्लेषकांकडे विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कारवाई नियमानुसार करण्यात येईल. अशी माहिती यो. कों. बेंडकुळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

            सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने त्या पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्यता असते. त्यासंदर्भात देखील अन्न व औषध प्रशासनामार्फत अंकुश ठेवण्यात आला असून शहरातील विविध आस्थापनामधून मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल विक्रेते व इतर किरकोळ विक्रेत्यांवर 64 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून खाद्यतेल, तुप, मिठाई, बेसण या अन्न पदार्थांचे भेसळीच्या संशयावरुन 52 नमुने घेण्यात आलेले आहे.

            प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की, शिळी, स्वस्त दरातील, रंगीत, हलक्या दर्जाची मिठाई तसेच इतर अन्नपदार्थ पारखुन घ्यावेत. तसेच मावा/खवा, मिठाई घेतांना विशेष काळजी घ्यावी,  मिठाइचे सेवन आठ तासाच्या आत करावे. पॅकबंद पदार्थांची खरेदी करतांना त्याचा समुह क्रमांक व उत्पादन तिथी तपासुन खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्याकडून खरेदी बिल घ्यावे. असे आवाहन यो. को. बेंडकुळे, सहायक आयुक्त, अन्न व औषधे प्रशासन, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण पुरक आकाश कंदील कार्यशाळा संपन्न

Next Post

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी भरपगारी सुट्टी -सहाय्यक कामगार आयुक्त बिरार

Next Post

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी भरपगारी सुट्टी -सहाय्यक कामगार आयुक्त बिरार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo