Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्यथा बँकांवर होणार फौजदारी कारवाई; सरकारचा इशारा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/05/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
अन्यथा बँकांवर होणार फौजदारी कारवाई; सरकारचा इशारा

शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक झाल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहजतेने उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी बँकांनी सिबिल स्कोअर मागता कामा नये. काही बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्जखात्यात टाकल्याच्या तक्रारीही आहेत. असा प्रकार घडता कामा नये. त्यावर तत्काळ कारवाई व्हावी, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

जलयुक्त शिवार योजनेचे काम झालेल्या ठिकाणी कमी पर्जन्यमान असतानाही संरक्षित सिंचन मिळून पिकांची उत्पादकता राखली गेली. त्यामुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ही कामे युद्धस्तरावर राबवून मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्रभावीपणे राबवावी, असंही ते म्हणाले.दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल.

जिल्ह्यात ‘स्कायमेट’ची 86 केंद्रे कार्यान्वित आहेत. नवी महसूल मंडळांतही ती कार्यान्वित करावीत. पावसाविषयीचे अंदाज, माहिती खेडोपाडी सर्वदूर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विमा कंपन्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असं फडणवीस म्हणाले.

Team Satymev Jayate

Previous Post

आता ‘हा’ पॅटर्न राज्यभर राबविणार, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा…

Next Post

जाणून घ्या ताजमहाल च्या संदर्भात काही गुप्त बाबी…

Next Post
जाणून घ्या ताजमहाल च्या संदर्भात काही गुप्त बाबी…

जाणून घ्या ताजमहाल च्या संदर्भात काही गुप्त बाबी...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo