Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/05/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
आजपासून होणार तुमच्या खिशावर परिणाम; जाणून घ्या सविस्तर माहिती

जळगांव- दर महिन्याच्या 1 तारखेपासून काहीना काही बदल होत असतात. जे तुमच्या खर्चाशी संबंधित असतात. दरम्यान, आता आज सोमवारपासून मे महिन्याला सुरुवात झाली असून आज 1 मे पासून 5 मोठे बदल झाले आहे.

मुंबई मेट्रोच्या भाड्यात 25 टक्के सूट:- 1 मे पासून, मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास शुल्कात 25 टक्के सवलत जाहीर केली आहे. या लाईन्स महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDAA) द्वारे चालवल्या जातात. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं दाखवावी लागतील.

जीएसटी नियमांमध्ये बदल:- १ मे पासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन नियमानुसार, आता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती 50 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी लागेल. ते बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.

म्युच्युअल फंड:- बाजार नियामक संस्था SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच ई-वॉलेटचा वापर केला आहे याची खात्री करण्यास सांगितले आहे, ज्यांचे KYC पूर्ण आहे. हा नियम १ मेपासून लागू होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात. केवायसीसाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मोबाइल नंबर आणि बँक तपशील द्यावा लागेल. या सर्व तपशीलांसह, केवायसीसाठी एक फॉर्म भरावा लागेल.

PNB ग्राहकांसाठी मोठा बदल:- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवे नियम १ मे पासून लागू होणार आहेत. एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून 10 रुपयांसह जीएसटी घेतला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिली आहे.

एलपीजीच्या दरात बदल:- पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. 1 एप्रिल रोजी सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 91.50 रुपयांची कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती एका वर्षात 225 रुपयांनी कमी झाल्या आहेत. 1 मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल दिसू शकतात.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळणार आता रिल्सवर….

Next Post

MPSC च्या उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा; साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवार राहिले हजर

Next Post
प्रत्येक केंद्रावर असणार आरोग्य विभागाचे निरीक्षक; आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

MPSC च्या उमेदवारांची संख्येचा विक्रम मोडणारी परीक्षा; साडे चार लाखांपेक्षा जास्त उमेदवार राहिले हजर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d