Tuesday, September 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात मुळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या दंतकथेचे अभिवाचन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात मुळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या दंतकथेचे अभिवाचन

जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात आज मूळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह याच्या दंतकथा ह्या साहित्य कृतीचे भारत सासणे यांनी केलेल्या अनुवादाचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा जयदीप पाटील, नाट्यकर्मी पियुष रावल, मनीष वाणी तसेच ‘हे मृत्युंजय’ नाटकातील कलाकार नितीन वाघ लाभले.खरं तर कथा कोंबड्याची पण हळू हळू सुरू झालेला प्रवास कथा नेमकी कोंबड्याची आहे की माणसाची असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत जातो. प्रेक्षक कोंबड्याच्या आयुष्याशी आपले आयुष्य तोलून पाहतो. कोंबड्याची जगण्याची प्रबळ इच्छा तो स्वतःत अनुभवतो. स्वार्थाने, लालसेने अंध झालेले रक्तपिपासू मालक माणसे कोंबड्यासारखेच आपल्या आयुष्यात तो अनुभवतो.गावाकडे गावभर हिंडणारा कोंबडा शहरात आल्यावर शहरी खुराड्यात रमत नाही. पोटासाठी प्राण्यांना खाणारे प्राणी नैसर्गिक, पण भुकेसाठी प्राण्यांची शेती करणारा  माणूस खरंतर प्राणी तरी आहे का असा प्रश्न पडलेला कोंबडा माणसांच्या जगात जीव वाचवत फिरतो. कोंबड्याच्या दृहतीने माणसाच्या जगाचं दर्शन हा वेगळा अनुभव आजच्या अभिवाचनाने दिला. खरंतर हर्षल पाटील उत्तम अभिवाचक आहेतच पण त्यांच्या दिग्दर्शक कौशल्याने रसिक प्रेमरसात बुडाले. शितल पाटील, अक्षय नेहे व हर्षल पाटील यांनी समरस होऊन अभिवाचन केले तर राहुल-लिना निंबाळकर यांच्यातील प्रेम प्रसंगांना रसिकांनी भरभरून दाद दिली. कोंबड्या कोंबडीच्या प्रणय चित्रपटाच्या प्रेमप्रसंगांपेक्षा अधिक खरा वाटला.अभिवाचन महोत्सवाला राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. यावेळी मान्यवरांचे स्वागत अमित माळी व हर्षदा कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या ‘दंतकथा’ अभिवाचनाची संकल्पना किशोर पवार, निर्मिती निलीमा जैन, दिग्दर्शन हर्षल पाटील, नेपथ्य राजू बाविस्कर, संगीत मंगेश कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मंजुषा भिडे यांनी केले. उद्या भुसावळ येथील विरेंद्र पाटील दिग्दर्शित ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन केले जाणार आहे, उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पुण्यस्मरण सप्ताहास सुरुवात

Next Post

गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे पुण्यस्मरण सप्ताहास सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo