Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :- आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापूर जि. नंदुरबार येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेवू इच्छीतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकामार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांचेकडे  28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत.

            या आश्रमशाळेत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धा परिक्षा 3 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. जे आदिवासी विद्यार्थी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 4 थी च्या वर्गात शिकत असून परीक्षेला बसणार आहेत. व पुढील वर्षी इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांकरीता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, गंगापूरी, ता. जामनेर, जि. जळगाव आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिवद, ता. अंमळनेर, जि. जळगाव या दोन केंद्रावर परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

            ही परिक्षा शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेले इयत्ता 4 थीत शिकत असलेल्या अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे. ही परिक्षा पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर आधारित आहे. या आश्रमशाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रु. एक लाखाच्या आत असावे.

            इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश परिक्षेचा अर्ज, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावा. असे आवाहन सहा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडील 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo