Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

चाळीसगाव(प्रतिनिधी)- कोरोना विरोधातील लढाईत गेली दीड वर्ष तन – मन- धनाने चाळीसगाव वासीयांच्या सेवेवर असणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या असून चाळीसगाव शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी दि.४ सप्टेंबर २०२१। रोजी एकाच दिवसात एकाच ठिकाणी घेतलेल्या जम्बो लसीकरण शिबिरात २००० नागरिकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला गेला. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणापासून वंचित असणाऱ्या हजारो नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाल्याने चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी हे शिबीर बूस्टर डोसच ठरल्याची प्रतिक्रिया शहरातून येत होती.विशेष म्हणजे अवघ्या काही तासात या शिबिराचे नियोजन करण्यात आले असूनदेखील दिवसभरात आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत स्वतः आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व युवा मोर्चा चे पदाधिकारी – कार्यकर्ते, शिवनेरी फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी घेतलेल्या मेहनतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिबीर यशस्वी करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण हेदेखील पूर्णवेळ शिबिराच्या ठिकाणी थांबत लसीकरणावर लक्ष ठेवून होते व येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करत होते. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येकासाठी पाण्याची आणि ग्लुकोज बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती.पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर जम्बो कोरोना लसीकरण शिबिर बंदिस्त ठिकाणी घ्यावे लागणार होते. तेली समाज मंडळाच्या दातृत्वाने एम.जी.नगर येथील तेली समाज मंगल कार्यलय लसीकरण शिबिरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. तसेच तेली समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी देखील शिबिरात पूर्णवेळ थांबत नियोजनात सहभाग घेतला.

Team Satymev Jayate

Previous Post

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

Next Post

केसीईत शिक्षक दिन साजरा

Next Post
केसीईत शिक्षक दिन साजरा

केसीईत शिक्षक दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo