Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आशियाच्या जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.३ – सध्या असलेली कोरोनाची परिस्थिती आणि या जागतिक आपत्तीनंतर बांधकाम क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान घेऊन उपलब्ध होणाऱ्या संधीविषयी जगभर जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील परिषद ५ जुलैपासून सुरू होत आहे. मंगळवार दि.६ रोजी जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ते ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग अँप्लिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून जगभरात त्याचा उपयोग केला जात आहे. जगभरातील निवडक बांधकाम अभियंत्यांचे मार्गदर्शन जगभरातील अभियंत्यांना मिळावे यासाठी जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल कन्स्ट्रक्शन हा ऑनलाईन डिजिटल कन्स्ट्रक्शनचा सर्वात मोठा आभासी कार्यक्रम आहे.

आशिया खंडाची परिषद ५ जुलैपासून सुरू होणार असून त्यात जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी होत आहे. परिषदेत गौरांक पाटील हे BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग या विषयाची ओळख करून देणार असून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या समन्वयाने अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (EPC) प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

गौरांक हा माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा मुलगा असून त्याने पुणे विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे येथून ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पीजीपी आणि एमबीए पूर्ण केले आहे. जळगावातील एका युवा अभियंत्याची जागतिक स्तरावरील परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

भारतीय वेळेनुसार गौरांक पाटील हे दि.६ रोजी सकाळी ७.४५ वाजता मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश असून सर्वांना मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सहभागी होण्यासाठी  https://www.festivalofdigitalconstruction.com/register-for-digital-construction-asia या लिंकचा उपयोग करावा.

गौरांक पाटील यांचे आजवरचे यश

विशेष गौरव, सन्मान :
१. उरल फेडरल युनिव्हर्सिटी, रूस येथे पदवीधर फेलोशिपमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार
२. यूएसएएल फेडरल युनिव्हर्सिटी, रशिया येथे पदवीपूर्व फेलोशिपमध्ये सिव्हिल विभागातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार.

शोधनिबंध प्रकाशित :
१. सोलर शेअरींग व प्रकाश अपवर्तनाच्या तत्त्वाचा उपयोग करून शेतात उत्पादन आणि बाष्पीभवन कमी करणे.
२. रचना नियोजन, बांधकाम कामे (अभियांत्रिकी) मंजूर करणे व देखरेखीसाठी बीआयएम फ्रेमवर्कचा प्रस्ताव.
यासह ३८ शोधनिबंध आजवर प्रकाशित झाले आहेत.

‘गौरांक’चा ब्लॉग :
माझा अभियांत्रिकीचा प्रवास –
(www.gaurankpatil.blogspot.in)

अतिथी व्याख्याने आणि विषय :


१. रोटरी क्लब पिंपरी चिंचवड आयोजित ‘रिसर्च पेपर’ कसे प्रकाशित करावे.


२. एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स पुणे द्वारा आयोजित संशोधन पेपर लिहिणे
३.ईपीसी प्रकल्पांमध्ये बीआयएम व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे अर्ज – झील एज्युकेशन सोसायटी, पुणे आयोजित.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

टायगर ग्रुप चे बुलंद तोफ गौरवभाऊ उमप यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण संपन्न

Next Post
टायगर ग्रुप चे बुलंद तोफ गौरवभाऊ उमप यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण संपन्न

टायगर ग्रुप चे बुलंद तोफ गौरवभाऊ उमप यांच्या वाढदिवसानिमित्ताने जामनेर येथे वृक्षारोपण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d