Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. डॉ.तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगर व नाशिकला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ. डॉ.तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगर व नाशिकला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र

लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

संगमनेर (प्रतिनिधी ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे मोठे असून विद्यार्थी व कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीकोनातून अहमदनगर व नासिक येथे तातडीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यान्वीत करावे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे.
नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीत आ.तांबे यांनी ही प्रमुख मागणी केली.यावेळी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,कृषीमंत्री ना.दादा भुसे,आ.लहु कानडे,आ.किरण लहामटे,आ.मोनिका राजळे,मुख्य सचिव अजय मेहता, विभागीय आयुक्त राजाराम माने, प्रधान सचिव एकनाथ डवले यांसह सर्व आमदार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. याअंतर्गत महाविद्यालयांची संख्याही खूप मोठी आहे. गुणवत्तापुर्ण विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या सोयीच्या दृष्टीने नगर व नाशिक येथे 13 ऑगस्ट 2014 ला निर्णय झाला मात्र साडेचार वर्ष होवूनही याबाबद अद्यापही कोणतीही कार्यवाही नाही. वेळोवेळी मागण्या झाल्या, विधानपरिषदेतही अनेक वेळा हा विषय चर्चेला गेला अहमदनगर व नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र स्थापनेसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र बांधकामासाठी शासन निधी देत नसल्याने अनेक विद्यालये व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. म्हणून सरकारने तातडीने हा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावून अहमदनगर व नासिक येथे तातडीने पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.यावर मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर – नाशिक उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करण्यासंदर्भात येत्या आठवड्याभरात निर्णय घेण्याचे सकारात्मक संकेत दिले.यामुळे हे उपकेंद्र लवकर सुरु होणार असल्याने नगर – नाशिक मधील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नवउद्योजकांना बळ मिळण्यासाठी मेळावे गरजेचे- अॅड. उज्ज्वल निकम

Next Post

प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात;संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिनव उपक्रम

Next Post

प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात;संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिनव उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d