Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रकल्पाद्वारे विद्यार्थी पोहोचले फुलांच्या जगात;संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव : जाऊया फुलांच्या जगात…पिवळे, लाल, निळे, पांढरे…रंगीबेरंगी…असे म्हणत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फुलांचे महत्व, त्याचे फायदे जाणून घेत विविध फुलांच्या प्रकाराचे प्रात्यक्षिक करून पाहिले.

प्रसंग होता मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील. विद्यार्थ्यांसाठी फुलांचा प्रकल्प शुक्रवारी ३१ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध रंगांची, विविध प्रकारची फुले विद्यार्थ्यांसाठी आणत त्यांना त्याची माहिती संस्थेचे सचिव व उपशिक्षक मुकेश नाईक यांनी करून दिली. फुलांचा उपयोग कुठे, कसा होतो याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शिक्षिका किरण पाटील यांनी विविध फुलांबद्दल माहिती सांगितली. प्रसंगी वातावरणात शिक्षिका रोहिणी शिंदे यांनी फुलांविषयी विविध गाणी सादर करीत कार्यक्रमात जल्लोष निर्माण केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी फुलांचे विविध प्रकार करून दाखविले. यात गजरा, तोरण, हार, वेणी यासह फुलांच्या सुरेख रांगोळ्या देखील विद्यालय परिसरात काढून दाखविल्या. या कलाकृती काढण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, जया पाटील, माधुरी सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ. डॉ.तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगर व नाशिकला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा गांधीना अभिवादन

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात महात्मा गांधीना अभिवादन

Comments 1

  1. चंद्रकांत पाटील says:
    6 years ago

    आमच्या राज प्राथमिक /माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनिलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेज मेहरुण जळगाव येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन निमित्त विनम्र अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo