Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या सभेत ‘न्यू जेन’वर पुरस्कारांचा वर्षाव!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या सभेत ‘न्यू जेन’वर पुरस्कारांचा वर्षाव!

जळगाव, दि.३ – इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अंतर्गत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनने समाजासाठी विविध क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्प राबवून महिलांना स्वतंत्रपणे कसे उभे राहावे यासाठी व्यासपीठ दिले, ज्येष्ठ नागरिकांना प्रेम व आपुलकी दिली तसेच विविध प्रकल्पही राबविल्याने नुकतेच पार पडलेल्या इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या सभेत क्लबच्या सदस्यांनी विविध पुरस्कार पटकावले.

इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303 ची ३२ वी सभा ‘मांदियाळी’ आणि पुरस्कार सत्र ‘सार्थक’ नुकतेच चाळीसगाव येथे संपन्न झाले. ज्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरल यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनने महिलांना शिक्षित होण्यासाठी आणि स्वतंत्रपणे घरात बसून स्वतःचा व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण, मुलांना ई-लर्निंग किटचे वितरण तसेच आणि इतर समाजोपयोगी उपक्रम राबविले. तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अनन्या रॅलीकॉन कॉन्फरन्समध्ये देखील क्लब सहभागी त्याठिकाणी दिव्यांगांसाठी उपक्रम राबविण्यात आला.

इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या कार्याची दखल घेत अध्यक्षा नेहा संघवी यांना ७ पुरस्कार, सचिव इशिता दोशी यांना २ पुरस्कार, खजिनदार नेहा नैनानी यांना २ पुरस्कार, क्लब आयएसओ मुनिरा मास्टर यांना १ पुरस्कार प्राप्त झाला.

असोसिएशनच्या खजिनदार सरोज कठियार, जिल्हाध्यक्ष अश्विनी गुजराती यांच्यासह इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या अध्यक्षा नेहा संघवी, सचिव इशिता दोशी, खजिनदार नेहा नैनानी, आयएसओ मुनिरा मास्टर, गुंजन कथुरिया आणि सदस्य गायत्री कुलकर्णी, हेतल सुरतवाला आणि मोना गांधी यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजकार्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाचा विद्यार्थींशी संवाद

Next Post

विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

Next Post
विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo