Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न -महसूलमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे(प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्यासोबतच उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे, सचिव सागर तुपे, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, सहकार क्षेत्रामुळे बँकिंग, सहकारी साखर कारखाने, दुधसंघ, पतसंस्थाचे जाळे ग्रामीण भागात वाढले त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्याप्रमाणे उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही अशीच प्रगती व्हावी यासाठी या क्षेत्रात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक परवान्याची संख्या तसेच इतरही बाबतीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. ऑनलाईन सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई-पीक पाहणी याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी शासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर,मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

Team Satymev Jayate

Previous Post

गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने  खास पथक निर्माण करावे -मंत्री विजय वडेट्टीवार

Next Post

वैजनाथ शिवारात वाळू उपसा जोमात; प्रशासन मात्र कोमात

Next Post
वैजनाथ शिवारात वाळू उपसा जोमात; प्रशासन मात्र कोमात

वैजनाथ शिवारात वाळू उपसा जोमात; प्रशासन मात्र कोमात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo