Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपचाराच्या पुरेशा सोयी असलेल्या खाजगी रुग्णालयांनाच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शन मिळणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
उपचाराच्या पुरेशा सोयी असलेल्या खाजगी रुग्णालयांनाच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शन मिळणार


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 – म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुगांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुगणालयात पुरेशा सोयीसुविधा तसेच तज्ञ डॉक्टर असेल तरच या रुग्णालयांना उपचाराकरीता Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या असून तसे परिपत्रक निर्गमित केले आहे.
जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळणाऱ्या व बाधित झालेल्या रुग्णांवर काही खाजगी रुग्णालयात डॉक्टर तात्पुरत्या स्वरुपाचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी काही सुचना निर्गमित केल्या आहेत. यात ज्या रुग्णालयात म्युकरमायकोसीस आजारावर उपचार अथवा रुग्ण दाखल केले जातात. अशा रुग्णालयांमध्ये कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर, Opthalmologist, सर्जन (Oral Surgen) यांच्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास व जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविणे आवश्यक राहील. या रुग्णांलयामध्ये शस्त्रक्रिया (Surgical procedure) च्या बाबतीत Debridement, Enucleation करण्याच्या पुरेशा सोसी उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
या बाबींची पुर्तता करणाऱ्या रुग्णालयांनाच उपचाराकरीता जिल्हा शल्य चिकित्सक Amphotericin B इंजेक्शनचे वितरण करतील याची सर्व रुग्णालयांनी नोंद घ्यावी. या सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम नुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एस. एस. मणीयार विधी महाविद्यालय आयोजित ऑनलाईन प्रात्यक्षीक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

Next Post

म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo