Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपमुख्यमंत्र्यांनी केली विकासकामांची पाहणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
उपमुख्यमंत्र्यांनी केली विकासकामांची पाहणी

बारामती(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

श्री. पवार यांनी आज बारामती येथील कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत नदीतील कामांची, दशक्रिया विधी घाट, परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण इत्यादी कामांची कामाची पाहणी केली.

यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगरराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सर्व विभागांनी विकास कामे दर्जेदार करण्याचे निर्देश दिले. परकाळे बंगला येथील कॅनलच्या भिंतीशेजारी लावण्यात येणारी झाडे एका रेषेत आणि समान अंतरावर लावावी. विकासकामांसाठी विभागाने प्रस्ताव सादर करताना सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होतील याचेही नियोजन करावे. असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, उपअभियंता राहूल पवार आदी उपस्थित होते.

बारामती नगरपरिषद आणि एन्वायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया बारामती शाखेच्या संयुक्त विद्यमाने बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत वृक्षारोपण अभियान राबवून 7 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जनहित प्रतिष्ठान ज्ञान प्रबोधनी हायस्कूल, गुजर इस्टेट आणि परकाळे बंगला येथील कॅनलवर वृक्षलागवड करुन करण्यात आला. यावेळी सुजित जाधव मित्रपरिवार तांदुळवाडी यांच्या तर्फे मोहगणीची शंभर रोपे नगरपरिषदेस मोफत देण्यात आली.

यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगपरिषदेचे सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा; मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त

Next Post

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo