Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन;विजेत्याला ३ लाख रुपयाचे बक्षीस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन;विजेत्याला ३ लाख रुपयाचे बक्षीस

जळगाव-(प्रतिनिधी) – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक १ जून ते ३० जून पर्यंत करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याकारणाने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे.


राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक ३ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह सोबतच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात सन २०११ पासून व जिल्ह्यात सन २०१८ पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांच्या जीवनमानात फरक पडला आहे. या यशोगाथाना दृकश्राव्यमाध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा १ जून ते ३० जून दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे.


स्पर्धकांनी जिल्हास्तरावर १५ जून पर्यंत चित्रफित सादर करावी. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकापैकी उत्कृष्ट ५ स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांचे चित्रफिती राज्यकक्षाकडे पाठविण्यात येतील व ३० जून पर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त ७ मिनिट असावा. दर्जा उत्तम (HD) असावा, चित्रफित अप्रकाशित असावी.
लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी, स्वयं सहायता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, यांच्या सह सर्वसामान्य नागरीकांनाही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील, जिल्हा व्यवस्थापक श्री. हरेश्वर भोई 9552330350 जिल्हा परिषद व संबंधित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत, समिती यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.


या स्पर्धेमुळे राज्यातील स्वयंसहायता गटांच्या यशकथा दृकश्राव्य स्वरूपात समोर येण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठीचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव डॉ.पंकज आशिया , प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सौ . मिनल प्रमोद कुटे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बळीराजाच्या आरोग्यासाठी…

Next Post

मातंग समाजात अंतर्भाव असणा-या व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना व बिजभांडवल योजना

Next Post

मातंग समाजात अंतर्भाव असणा-या व्यक्तींना अर्थसहाय्य आनुदान योजना व बिजभांडवल योजना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo