Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे अटी व शर्थीच्या आधारे चालू करण्यास परवानगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

उस्मानाबाद, दि. 8 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यातील मुद्या क्र.10 मध्ये असू नमूद केले आहे की, राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार परवानगी देण्यात आलेल्या बाबी त्यामध्ये नमूद केलेल्या प्रतिबंधांसह चालू राहतील.
महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले असून या आदेशातील मुद्या क्र. 9 (7) नुसार राज्य शासनाने निर्धारित केलेल्या किमान अंतराच्या अधीन राहून महामार्गावरील ट्रक दुरूस्तीची दुकाने (गॅरेज), धाबे सुरु राहतील, असे नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारानुसार कोरोना विषाणू (COVID-19)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे खालील अटी व शर्थीच्या आधारे चालू करणेस परवानगी दिली आहे.
धाब्यावर असलेल्या स्वयंपाकगृहामध्ये वारंवार आवश्यक ती स्वच्छता व निर्जतूकीकरण करणे बंधनकारक असेल. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तीक स्वच्छता राखणे, मास्क, हॅन्डग्लोज, गॉगल सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. धाबामध्ये पर्यावरण पुरक (environment friendly) व नष्ट करता येऊ शंकतील अशा (disposable) प्लेट्स, ग्लास, बॉटलस इत्यादीचा वापर करावा. वैद्यकीय निकषानुसार निश्चीत केलेले सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने आवश्यक मार्कींग करण्यात यावे. धाबा चालू ठेवण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही. धाब्यावर गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात यावी. धाब्यावर जेवणासाठी येणाऱ्या व्यक्तीना हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण, पाणी इत्यादी उपलब्ध करून देण्यात यावे. वेळोवेळी शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे धाबाचालकावर बंधनकार राहील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच “ महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020” चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या इतर जिल्ह्यातील, राज्यातील व्यक्तींना त्यांचे जिल्ह्यात, राज्यात सोडणाऱ्या वाहनचालकांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना

Next Post

परिवहन महामंडळाची विभागीय व आगार कार्यशाळेचे कामकाज करण्यासाठी सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी

Next Post

परिवहन महामंडळाची विभागीय व आगार कार्यशाळेचे कामकाज करण्यासाठी सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo