Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

जळगाव : ऍक्युपंक्चर थेरपीचा उगम हा भारतात झाला. मात्र त्याचा उपयोग हा इतर पाश्चात्य देशात अधिक प्रमाणात होत आहे. ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील असून इच्छुकांनी ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन प्रतिभा कोकंदे यांनी केले.

शहरात अक्युपंक्चर प्राथमिकता आणि उपचार प्रशिक्षण हि दोनदिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेत कोकंदे यांनी मार्गदर्शन केले. धकाधकीची जीवनशैली आणि जागतिक प्रदूषण ह्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अक्युपंक्चर उपचाराद्वारे यावर उपचार करता येणे शक्य झाले आहे. यासाठी राज्य सरकारने अक्युपंक्चर उपचारासाठी एक कौन्सिलची स्थापना केली असून त्यामार्फत पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याला मुदतवाढ देखील देण्यात आलेली असून यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

प्रतिभा कोकंदे यांनी, दमा, सायटिका, विनाऔषधी पाठदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, रक्तदाब, अर्धांगवायू या आजारावर उपचार घेता येतात. त्याला साईड इफेक्ट नाही असे सांगून अक्युपंक्चर उपचाराची प्राथमिक माहिती, करावयाचे विविध उपचार याविषयी देखील कार्यशाळेत प्रशिक्षण दिले. अक्युपंक्चर शास्त्र शरीरावर कसे कार्य करते आणि त्याद्वारे उपचार कसे करावे याची देखील माहिती डॉ. कोकंदे यांनी दिली. कार्यशाळेला प्रतिसाद मिळाला. यापुढील शिबीर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असून त्यासाठी नावनोंदणी श्री हॉस्पिटल, रामानंद नगर रोड येथे सुरु आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 47 तक्रारी अर्ज दाखल

Next Post

‘फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव

Next Post
‘फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत  जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव

'फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo