Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑनलाईन पद्धतीने दोन दिवसीय पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2020
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
ऑनलाईन पद्धतीने दोन दिवसीय पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव.दि.22 (जिमाका) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव आणि लघु उद्योग भारती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने 29 व 30 जून 2020 दोन दिवसीय ऑनलाईन पद्धतीने “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. जळगांव जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp, Zoom etc) तसेच मोबाईलद्वारे घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.    

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे मागील काही दिवसांपासुन अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे बरेचसे परप्रांतीय कामगार/मजूर हे त्यांचे गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन कंपन्या औद्योगिक आस्थापनांना व्यवसाय उद्योग हे सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसुचित  करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रता धारकांना ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरंस (Skype, Whatsapp,Zoom etc) तसेच मोबाईलद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त  बेरोजगार युवकांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव अ.ला.तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ८१ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले; ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद

Next Post

मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे कविसंमेलन रंगले; ऑनलाईन मिळाली रसिकांची दाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo